किल्लारी येथे दोन दूकाने फोडून २ लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:40+5:302021-06-02T04:16:40+5:30
पोलिसांनी सांगितले, किल्लारी पाटीवरील संतोष जाधव यांचे माउली मशिनरी या दुकानाचे शटरचे कुलप तोडून नवीन कॉपर वायर, भंगारचे कॉपर ...

किल्लारी येथे दोन दूकाने फोडून २ लाखांची चोरी
पोलिसांनी सांगितले, किल्लारी पाटीवरील संतोष जाधव यांचे माउली मशिनरी या दुकानाचे शटरचे कुलप तोडून नवीन कॉपर वायर, भंगारचे कॉपर वायर, पितळी बुश, कॅश काऊंटरमधील नगदी ३५ हजार रुपयाची चोरी झाली तर गोविंद बाबळसुरे यांचे प्रशांत किराणा स्टोअरचे शटर तोडून किराणा मालाची ५ हजाराची चोरी केली. शरद भोसले यांचे तेरणा सुपरमार्केट हे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. रोडकडील शटर तोडून आत जाण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. उपविभागीय पोलीस अधिकारी नवले, सपोनि सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी किल्लारी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ४२७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे करीत आहेत.