१ हजार ४२० चाचण्यांमध्ये १७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:40+5:302021-06-22T04:14:40+5:30
पॉझिटिव्हिटी रेट ३.३ टक्के प्रयोगशाळेतील चाचणीतील पॉझिटिव्हिटी रेट ३.३ टक्के आहे. तर रॅपिड अँटिजन टेस्टमधील पॉझिटिव्हिटी रेट ०.४ टक्के ...

१ हजार ४२० चाचण्यांमध्ये १७ रुग्ण
पॉझिटिव्हिटी रेट ३.३ टक्के
प्रयोगशाळेतील चाचणीतील पॉझिटिव्हिटी रेट ३.३ टक्के आहे. तर रॅपिड अँटिजन टेस्टमधील पॉझिटिव्हिटी रेट ०.४ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के असून, मृत्यूचे प्रमाण २.६ टक्के आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ६१० दिवसांवर असून, बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा आहे.
३२ रुग्ण कोरोनामुक्त
सोमवारी ठणठणीत बरे झाल्याने ३२ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील ३, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ९, मुलांचे शासकीय निवासी शाळा औसा येथील एक, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील २, दापका कोविड केअर सेंटर येथील ४, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील ८ अशा एकूण ३२ जणांनी कोरोनावर मात केली.