लातुरात शेवग्याला १६० रुपयांचा दर; खाद्यतेल महागल्याने सामान्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST2020-12-29T04:19:04+5:302020-12-29T04:19:04+5:30
लातूर शहरातील रयतू बाजार, महात्मा फुले भाजीमंडई आणि इतर ठिकाणी भाजीपाल्यांची विक्री होते. रविवारी हिरवी मिरची प्रतिकिलो ३० रुपये, ...

लातुरात शेवग्याला १६० रुपयांचा दर; खाद्यतेल महागल्याने सामान्यांना फटका
लातूर शहरातील रयतू बाजार, महात्मा फुले भाजीमंडई आणि इतर ठिकाणी भाजीपाल्यांची विक्री होते. रविवारी हिरवी मिरची प्रतिकिलो ३० रुपये, फुलकोबी २० रुपये, पत्ताकोबी ७, मेथी जुडी ७ रुपये, पालक जुडी ७, शेपू ५, चुका ८, चंदन बटवा ५, करडई ५ रुपये जुडी, कांदा जुडी १०, कोथिंबीर २० रुपये किलो, वांगी ५० रुपये किलो, भेंडी ५०, काकडी २५, दोडका ४०, भोपळा ३०, गवार ५०, बटाटा २०, सिमला मिरची २०, कांदे ४० रुपये किलो, लसूण १०० रुपये किलो, अद्रक ४० रुपये किलो, वटाणा ३० रुपये, वरणा ५०, चवळी शेंगा ५० रुपये किलो, तर शेवगा १६० रुपये किलोने विकला जात आहे.
भाजीपाल्यात शेवगा, वांगी, भेंडी, लसूण, चवळी, वरणाने भाव खाल्ला आहे. कांद्याचे प्रतिकिलोचे दर ४० रुपयांच्या घरात आहेत.
किराणा मालामध्ये पुन्हा खाद्यतेलाचे भाव वधारले आहेत. त्यापाठोपाठ लागणाऱ्या दैनंदिन डाळीही महागल्या आहेत. खाद्यतेल प्रतिकिलो १३० रुपये, हरभरा डाळ ७० रुपये, मूग डाळ ११०, मसूर डाळ ८०, तूर डाळ १२०, उडीद डाळ १३०, शेंगदाणा ९० रुपये, पोहे ४० रुपये, रवा ३०, दाळवं ८०, खोबरे १७० रुपये किलो मिळत आहे.
या आठवड्यात भाजीपाला महागला आहे. मेथी, पालक, शेपू, चुका, कांदा जुडी, कोथिंबीरचे भाव जेमतेम आहेत. मात्र, कांद्याचे भाव ४० च्या खाली उतरायला तयार नाहीत. गवार, वांगी, भेंडी, वरणा, चवळीचे प्रतिकिलोचे भाव ५० रुपयांच्या घरात आहेत. अद्रक स्वस्त, तर लसूण महागला आहे.