लातूरमध्ये जलजीवन मिशनची दीड हजार कोटींची कामे निकृृष्ट

By आशपाक पठाण | Updated: August 20, 2023 17:28 IST2023-08-20T17:28:02+5:302023-08-20T17:28:49+5:30

विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याची खासदार सुधाकर शृंगारे यांची मागणी

1.5 thousand crore Jaljeevan Mission's works in Latur are shoddy | लातूरमध्ये जलजीवन मिशनची दीड हजार कोटींची कामे निकृृष्ट

लातूरमध्ये जलजीवन मिशनची दीड हजार कोटींची कामे निकृृष्ट

आशपाक पठाण/ लातूर

लातूर : केंद्र सरकार पुरस्कृत असलेल्या जलजीवन मिशन योजनेची लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास १ हजार ५०० कोटी रुपयांची कामे सुरू असून, यापैकी बऱ्याच कामांमध्ये कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे. या कामाची विशेष समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये सध्या जलजीवन मिशनची कामे सुरू असून, या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये नळजोडणी आणि त्याद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा व्यापक उद्देश सरकारचा आहे. मात्र, जिल्ह्यातील जलजीवन मिशन विभागातील अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार यांनी मिळून अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत तसेच काही ठिकाणी कामे पूर्ण न करता संपूर्ण बिले काढून कामे अपूर्ण ठेवली आहेत. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून, याबाबत समिती नेमून सखोल चौकशी करावी आणि झालेल्या चौकशीचा अहवाल मला तत्काळ पाठवावा, असे निर्देश खा. सुधाकर शृंगारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

अधिकारी, ठेकेदारांची मिलिभगत...

लातूर जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिळून या कामांबाबतचा दर्जा अत्यंत निकृष्ट केलेला असून यामुळे या योजनेचा व्यापक दृष्टिकोन खालावत असून देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी मिळण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या जनकल्याणकारी योजनेचा जर कोणी गैरवापर करत असेल तर त्यांना माफ करणार नाही असेही खासदार सुधाकर शृंगारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: 1.5 thousand crore Jaljeevan Mission's works in Latur are shoddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.