औराद परिसरात वीज पडल्याने १५ जनावरे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST2021-05-08T04:20:25+5:302021-05-08T04:20:25+5:30
निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने जाेरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा तडाख्यात निलंगा तालुक्यातील ताडमुगळी, औराद, ...

औराद परिसरात वीज पडल्याने १५ जनावरे ठार
निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने जाेरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा तडाख्यात निलंगा तालुक्यातील ताडमुगळी, औराद, कलमुगळी, माळेगाव, तांबाळा, ममदापुर, सरवडी या गावासह कर्नाटक सीमा भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेकांचा भाजीपाला, फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. माळेगाव, तांबाळा शिवारात तर प्रचंड जाेराचा पाऊस झाला. गावच्या ओढ्याला पाणी येऊन पिकात घुसले आहे. ताडमुगळी येथील शाम गिरमाजी यांचे बैल, तांबाळा येथील तुकाराम म्हेत्रे यांची गाय, बैल, सरवडी येथील सतीश तळबुगे यांचे दाेन बैल, म्हैस, ममदापूर येथेही जनावरे ठार झाली. मिरखल येथील गाेपाळ म्हेत्रे यांच्या चार शेळ्या, अंकुश म्हेत्रे यांच्या शेळ्या या पावसात वीज पडून ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. याशिवाय इतर गावातही पाऊस झाल्याने नुकसान झाले. अनेक घरावरील पत्रे उडाली होती.