शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

लातूर जिल्ह्यात घरपट्टी, पाणीपट्टीचे १३ काेटी ६६ लाख थकित!

By हरी मोकाशे | Published: March 14, 2024 5:38 PM

जिल्हा परिषद : गावागावांत विशेष कर वसुली पंधरवाडा

लातूर : प्रत्येक गावांतील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतींकडून घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जाते. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन स्वाभिमान मोहीमही राबविण्यात आली. त्यामुळे वसुलीस गती मिळाली असली तरीही आणखीन १३ कोटी ६६ लाख ११ हजारांची थकबाकी शिल्लक आहे. ती वसूल करण्यासाठी आता विशेष कर वसूली पंधरवाडा राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक गावच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. मात्र, नियम, अटी आणि काही तांत्रिक बाबींमुळे गावातील सर्व भागांचा अपेक्षित विकास साधणे अडचणीचे ठरते. अशावेळी पाणीपट्टी, घरपट्टी कर वसुली अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यातून ग्रामपंचायतीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते.

जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतींची घरपट्टी, पाणीपट्टीची शंभर टक्के वसूली व्हावी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे अधिकाधिक कर वसूली झाली आहे.

एकूण कर : ६२,५६,२४,०००आतापर्यंतची वसुली : ४८,९०,१३,०००थकित रक्कम : १३,६६,११,०००

पावणेचार कोटींच्या घरपट्टीची थकबाकी...तालुका - थकित रक्कमअहमदपूर - ५७ लाख ४७ हजारऔसा - ५० लाख ७ हजारचाकूर - ३१ लाख २२ हजारदेवणी - २० लाख ५४ हजारजळकोट - १३ लाख ९३ हजारलातूर - ६९ लाख ८२ हजारनिलंगा - ५७ लाख ६१ हजाररेणापूर - २२ लाख ५२ हजारशिरुर अनं. - ११ लाख ६२ हजारउदगीर - ३७ लाख ५२ हजारएकूण - ३ कोटी ७२ लाख ३२ हजार

पाणीपट्टीपोटीच्या १० कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान...तालुका - थकित रक्कमअहमदपूर - ६७ लाख ४८ हजारऔसा - १ कोटी ३८ लाखचाकूर - ४८ लाख ९९ हजारदेवणी - २२ लाख २२ हजारजळकोट - १६ लाख ९३ हजारलातूर - ८२ लाख ३४ हजारनिलंगा - १ कोटी ११ लाखरेणापूर - ४० लाख ५३ हजारशिरुर अनं. - २० लाख ७८ हजारउदगीर - ६८ लाख ७४ हजारएकूण - ९ कोटी ९३ लाख

विभागीय आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी...जिल्ह्यात विशेष कर वसुली मोहीम राबवून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत कर वसुलीचे प्रमाण ७० टक्क्यांपेक्षा कमी दिसून येत असल्याने विभागीय आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर वसुली ही ग्रामपंचायतीची नियमित बाब व मुलभूत कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

कर वसुलीसाठी विशेष मोहीम...ग्रामपंचायतींची १३ कोटी ६६ लाखांची कर वसुली थकित आहे. त्यासाठी १५ ते ३१ मार्च हा कालावधी विशेष कर वसुली पंधरवाडा म्हणून राबविण्याच्या सूचना बीडीओंना केल्या आहेत. शंभर टक्के कर वसुलीचे नियोजन करावे.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषदTaxकर