निलंग्यात रबीच्या १२५ टक्के पेरण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:32+5:302020-12-07T04:14:32+5:30
... शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा किनगाव : अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याचबरोबर शेतीपंपासाठी रात्री ...

निलंग्यात रबीच्या १२५ टक्के पेरण्या
...
शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याचबरोबर शेतीपंपासाठी रात्री वीजपुरवठा हाेत असल्याने या भागातील शेतक-यांना रात्रभर जागून रबी हंगामातील पिकांना पाणी द्यावे लागत आहे. सध्या थंडी वाढल्याने शेतक-यांना अधिक त्रास होत आहे. महावितरणने याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करावी, अशी मागणी शेतक-यांतून सातत्याने होत आहे.
...
देवणीतील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे
देवणी : शहरातील काही भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह पादचा-यांना ये- जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डयांमुळे काही पडून जखमी झाले आहेत. रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तर पादचा-यांना कसरतच करावी लागत आहे. नगर पंचायतीने याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
...
चाकूर तालुक्यात यंदा रबीचा पेरा वाढला
चाकूर : ऑक्टोबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चाकूर परिसरातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. तालुक्यातील विहिरी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. त्याचबरोबर कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. परिणामी, रबीचा तालुक्यात पेरा वाढला असून आतापर्यंत १५९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक पेरा हरभ-याचा असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
...
गुटखा, पानमसाल्याची वलांडीत विक्री वाढली
वलांडी : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या विक्री वाढली आहे. हे गाव कर्नाटक सीमेजवळ असल्याने विक्रेते कर्नाटकातून सदरील साहित्य आणून चढ्या दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे तरुण पिढी त्याच्या आहारी जात आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.
...