लॉकडाऊनमुळे एसटीच्या उत्पन्नात ११३ कोटींची घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST2021-02-10T04:19:46+5:302021-02-10T04:19:46+5:30

लातूर : लॉकडाऊनमुळे एस.टी.च्या उत्पन्नात ११३.२१ लाख २ हजारांची घट झाली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये एस.टी. महामंडळाला ...

113 crore reduction in ST revenue due to lockdown | लॉकडाऊनमुळे एसटीच्या उत्पन्नात ११३ कोटींची घट !

लॉकडाऊनमुळे एसटीच्या उत्पन्नात ११३ कोटींची घट !

लातूर : लॉकडाऊनमुळे एस.टी.च्या उत्पन्नात ११३.२१ लाख २ हजारांची घट झाली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये एस.टी. महामंडळाला हा फटका बसला आहे. आता कोरोनाचे साखळदंड तोडून एस.टी. सुसाट धावत असली तरी एवढी मोठी घट भरून काढण्याचे आव्हान महामंडळासमोर आहे.

लातूर विभागात एस.टी. महामंडळाच्या ४९८ बसेसची संख्या आहे. त्यात साधी परिवर्तन बसेसची संख्या ४३७ असून, निमआराम बसेस २९ आहेत. शिवशाही २६ तर शयन आसनी ६ अशा एकूण ४९८ बसेस आहेत. या बसेसच्या प्रवासी वाहतुकीतून २०१९ मध्ये १९५ कोटी ८२ लाख १७ हजार रुपये उत्पन्न महामंडळाला मिळाले होते. तर २०२० मध्ये ७९ कोटी ३१ लाख ६ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. ११३ कोटी २१ लाख २ हजार रुपयांची घट आहे. दरम्यान, उत्पन्न वाढविण्यासाठी आता महामंडळाने टप्प्या-टप्प्याने प्रवासी फेऱ्या वाढविल्या असून, जास्त उत्पन्न मिळणाऱ्या मार्गावर अधिक लक्ष लातूर विभागाने केंद्रित केले असल्याचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले.

२०१९-२० मधील तुलनात्मक महिनानिहाय उत्पन्न

जानेवारी १४८७.१७

१५१७.५०

फेब्रुवारी १४८०.२१

१४४१.४७

मार्च ९६८.५९

१४९५.४९

एप्रिल १.९५

१७५७.११

मे ६७.२८

१८६६.६८

जून १०९.९७

१७००.३२

जुलै ६१.२८

१५६३.७३

ऑगस्ट १२७.६६

१५२९.८४

सप्टेंबर ४६६.०३

१४०८.९०

ऑक्टोबर ७७१.८६

२०१५.६५

नोव्हेंबर ११४५.३२

१५९८.६५

डिसेंबर १३०४.२८

१६३३.८३

एकूण ७९३१.६

१९५८२.१७

फेऱ्याद्वारे ह

Web Title: 113 crore reduction in ST revenue due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.