जिल्ह्यातील माध्यमिकच्या १०५ शाळा ऑफलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST2021-09-10T04:26:43+5:302021-09-10T04:26:43+5:30

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या गावांमध्ये महिनाभरात बाधित रुग्ण आढळले नाहीत, त्या गावातील ८ वी ते १२ वीचे वर्ग ...

105 secondary schools in the district are offline | जिल्ह्यातील माध्यमिकच्या १०५ शाळा ऑफलाइन

जिल्ह्यातील माध्यमिकच्या १०५ शाळा ऑफलाइन

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या गावांमध्ये महिनाभरात बाधित रुग्ण आढळले नाहीत, त्या गावातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. त्यानुसार सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ७७८ शाळांपैकी १०५ शाळा सुरू असून, ६ हजार २५० विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आहे. पालक, स्थानिक समितीच्या संमतीने या शाळा सुरू असून, कोविड नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, रुग्णसंख्या कमी झाली आहे तिथे शाळा सुरू करण्याबाबत काही दिवसांपूर्वी निर्णय झाला होता. त्यानुसार जिल्ह्यातील १०५ शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू आहेत. जिल्ह्यात ८ वी ते १२ वीची ३ लाख १३ हजार १८८ विद्यार्थी संख्या असून, प्रत्यक्षात ६ हजार २५० विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. शाळांत मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे काटेकोर पालन केले जात असून, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: 105 secondary schools in the district are offline