धनेगावात १० खाटांचा कोविड विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:34+5:302021-07-15T04:15:34+5:30
वलांडी : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे पूर्वनियोजन व तयारी करत देवणी तालुक्यातील धनेगाव येथील महादेव विद्यालयात १० खाटांचा सोयी-सुविधांनीयुक्त ...

धनेगावात १० खाटांचा कोविड विलगीकरण कक्ष
वलांडी : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे पूर्वनियोजन व तयारी करत देवणी तालुक्यातील धनेगाव येथील महादेव विद्यालयात १० खाटांचा सोयी-सुविधांनीयुक्त कोविड विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे.
स्वयं शिक्षण प्रयोग, भाजयुमो तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे व धनेगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोविड विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, गावातील रहिवासी व तहसीलदार संजय बिरादार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपसरपंच रवींद्रकुमार पाटील होते. यावेळी हरिभाऊ परिट, स्वयं शिक्षण प्रयोगचे जिल्हा समन्वयक दिलीप धवन, प्राचार्य रामलिंग मुळे, तालुका समन्वयक अजित धनुरे, बाळासाहेब बिरादार, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पवार, विठ्ठल बोयणे, सोमनाथ बिरादार, ज्ञानेश्वर बिरादार, संगाप्पा चरपले, जयंत पाटील, नागेश बिरादार, बाळासाहेब बिरादार, अनंत पाटील, रामभाऊ बिरादार, बाळासाहेब बिरादार, अमित बिरादार, श्रीदेवी बिरादार, इंदूताई पाटील, महानंदा बिरादार, आदी उपस्थित होते. या कक्षाच्या उभारणीसह उपकरण जोडणी, मदतकार्यासाठी लक्ष्मण पवार, अनंत पाटील, शंकर आपटे, शेटिबा पवार, पप्पू दंडवते, आदींनी परिश्रम घेतले.
सोयी-सुविधा उपलब्ध...
महिलांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष, पुरुषांसाठी स्वतंत्र कक्ष, प्रत्येक रुग्णासाठी खाट, वाफेचे मशीन, पाणी बाटली, ऑक्सिमीटर, तापमापक मशीन, बी. पी. तपासणी मशीन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, सॅनिटायझर, मास्क, इनव्हर्टर, रुग्णांच्या माहितीसाठी संगणक, स्वतंत्र स्वच्छतागृह अशा सोयी-सुविधांनीयुक्त असा विलगीकरण कक्ष आहे. त्यासाठी स्वयं शिक्षण प्रयोग, सीएफएमकडून निधी उपलब्धता व साहित्य पुरवठा करण्यात आला आहे.