शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकरी सापडेनात !

By हरी मोकाशे | Updated: September 8, 2023 19:02 IST

शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना डिसेंबर २०१९ पासून राबविण्यात येत आहे.

लातूर : नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत कर्जमुक्त करण्यासाठी प्रशासन व बँकांकडून गेल्या साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, त्यांचा अद्यापही पत्ताच लागला नसल्याचे दिसून येत आहे.

कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीपिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी संकटात सापडतो. सततच्या नुकसानीमुळे आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी कर्ज काढावे लागते. परिणामी, बळीराजा कर्जबाजारी होतो. नैराश्य आणि आर्थिक ताणतणावामुळे काही वेळेस शेतकरी आपली जीवनयात्रा संपविण्याचा मार्ग अवलंबतात. या परिस्थितीचा विचार करुन शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना डिसेंबर २०१९ पासून राबविण्यात येत आहे. योजनेसाठी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ कालावधीत अल्प मुदत पीककर्ज आणि पुनर्गठित दोन लाखांपर्यंत पीककर्ज माफ करण्यास सुरुवात झाली. योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ६५ हजार ५५२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव ऑनलाइन सादर झाले. आतापर्यंत ५८ हजार ४२६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे.

५८ हजार ५२६ शेतकऱ्यांना लाभ...कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील ६५ हजार ५५२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्यात आले होते. राज्य शासनाने आतापर्यंत कर्जमाफीसाठी एकूण ७ याद्या जाहीर केल्या आहेत. त्यात ६० हजार १९६ शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी ५८ हजार ८८५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यातील ५८ हजार ५२६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३४५.१९ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

बँकांकडे सातत्याने पाठपुरावा...

जिल्ह्यातील ६० हजार १९६ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असले तरी प्रत्यक्षात ५८ हजार ८८५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. जवळपास साडेतीन वर्षांपासून १ हजार ३११ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून बँका, सहायक निबंधक कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, या शेतकऱ्यांचा अद्यापही ठावठिकाणा लागला नाही.

काहींचा अंगठा जुळेना...कर्जमाफीच्या लाभासाठी काही शेतकऱ्यांना अंगठा जुळत नसल्याने अडचण होत आहे. शिवाय, काही शेतकरी मयत झाले आहेत. तर काहींचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ हजार ३११ शेतकऱ्यांचा शोध लागत नाही. योजनेचा लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे.

योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न...

कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६० हजार १९६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ५८ हजार ८८५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यातील ५८ हजार ५२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाकडून ३४५.१९ कोटींची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित १३११ शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर