अडीच हजार निराधारांना १ कोटींचे अनुदान घरपोच वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:19 IST2021-05-23T04:19:19+5:302021-05-23T04:19:19+5:30
माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख व आ. धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीणची संगांयो समिती तालुक्यातील निराधारांसाठी ...

अडीच हजार निराधारांना १ कोटींचे अनुदान घरपोच वाटप
माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख व आ. धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीणची संगांयो समिती तालुक्यातील निराधारांसाठी विविध उपक्रम राबवीत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन निराधारांना घरपोच अनुदान वाटप करण्यासाठी सुचना होत्या. त्यानुसार मध्यवर्ती सहकारी बँकेचेअध्यक्ष श्रीपती काकडे, उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाठ, नाथसिंह देशमुख, सुदाम रूकमे, एच.जे. जाधव, सदस्य अमोल देडे, शितल राजकुमार सुरवसे, धनंजय वैद्य, हरीश बोळंगे, अमोल भिसे, संजय चव्हाण, परमेश्वर पवार, रमेश पाटील, आकाश कणसे, लातूर जिल्हा बॅंकेचे तालुका फिल्ड ऑफिसर राजु मोरे,अंगद मगर यांनी घरपोच अनुदान वाटपाचे नियोजन केले.
या गावातील लाभार्थ्यांना मिळाले अनुदान...
लातूर तालुक्यातील निवळी, भडी, सलगरा खु., बाभळगाव, बोकनगाव, रमजानपूर, हरंगुळ बु., गंगापूर, शिराळा, तांदुळवाडी, रामेगाव, गाधवड, सिरसी, कारसा, बोपला, खंडापूर या १६ गावांतील २ हजार ५०७ निराधारांना १ कोटी १३ लाख ५२ हजार २६ रुपयांच्या अनुदानाचे घरपोच वाटप करण्यात आले. उर्वरित गावांतील निराधारांनाही घरपोच अनुदानाचे वाटप करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले.