ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यात एक शेतकरी भर पावसात वाहून जाणारा शेतमाल वाचवण्याचा प्रयत्न करत होता. या व्हिडीओची दखल केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतली. ...