प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहामध्ये नेण्यास मज्जाव करणे आणि खाद्यपदार्थांची वाढीव किमतीने विक्री करण्याविरोेधातले आंदोलन मनसेने आता परत सुरू केले आहे. ...
गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारताचे आघाडीचे फलंदाज दुसऱ्या डावातही ढेपाळले आहेत. मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहूल, अजिंक्य रहाणे यांच्या निराशाजनक कामगिरीनंतर विराट कोहलीच्या चिवट खेळीमुळे भारत दिवसाअखेर ५ बाद ११० धावांवर आहे. ...
गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी गणेशोत्सव मंडळांना दिले आहे. ...
मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर आणि पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असलेल्या आंदोलनाची मालिका मराठवाड्यात कायम आहे. शुक्रवारी लातूर, हिंगोलीत आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
नवीन महाराष्ट्र सदनाचे वेध देशातील महात्वाच्या पक्षातील सर्वच दिग्गज नेत्यांना लागले आहे. ‘सबकी पसंद, महाराष्ट्र सदन’ असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ...
बेरोजगारीच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा हल्ला कल्याणचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ च्या आकडेवारीनुसार देशात तीन कोटींहून अधिक लोक बेरोजगार असल्याची माहिती त्यांनी दिली. ...
महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक ३३ खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी क्रीडा विभागाला दिले. ...