भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मुंबई प्रदेशतर्फे महागाई, भ्रष्टाचार व शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी कारभाराविरोधात बुधवारी, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता धडक मोर्चाची हाक देण्यात आली आहे. ...
पेट्रोल व डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे वाहतूकदार नाराज आहेत. डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूकदारांचा खर्च वाढणार असल्याने सुमारे १५ टक्के दरवाढ होण्याची भीती आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर समितीचे अध्यक्ष बाल मलकित सिंग ...
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे काम आॅक्टोबरपासून सुरू करण्यात येईल. पाच वर्षांत काम पूर्ण झाल्यानंतर वांद्रे-वर्सोवा हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करणे शक्य होईल. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच नैसर्गिक नाही, काँग्रेसमधून बाहेर पडलेला हा पक्ष आहे. त्यामुळे भाजपाबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही, असा टोला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी लगावला. ...
जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेतून नृत्य करण्याचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून, हिट्स मिळविणाऱ्या तीन उच्च शिक्षित तरुणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. ...
अंबरनाथ येथील सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्थेसह त्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यात इतरत्र बांधण्यात आलेल्या निवासी संकुलांतील बांधकामे नियमानुकूल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेत राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी हजारो नागरिकांना दिलासा दिला. ...
अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश आहे. तत्त्वज्ञानाची प्रत्येक पायरी ही मानवी जीवनाची महत्त्व पटवून देणारी चढण आहे. या तत्त्वज्ञानाच्या केंद्रबिंदूतूनच महाभारत रामायणासारखे ग्रंथ निर्माण झाले आहेत. ...
न्या. एम. एस. शंकळेशा व न्या. संदीप के. शिंदे यांनी दिलेल्या या निकालानुसार नवले व मोकाशी यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून त्यांनी तो चार आठवड्यांत भरायचा आहे. ...
तुम्ही जर नजीकच्या काळात रेल्वे प्रवासाचे नियोजन करीत असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) वेबसाइटवरून अथवा अॅपवरून तिकीट बुक केल्यास तिकीट दरात १0 टक्के सवलत मिळणार आहे. ...