रविवार पेठेतून मनीष मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरच महानगरपालिकेची कचरा कुंडी असून त्यामधला कचरा हा सगळा रस्त्यावर पडला आहे. स्वच्छतागृहाच्यासमोरच कचरा कुंडी असल्याने स्वच्छतागृह आणि कचरा कुंडी यांच्या दुर्गंधीने स्थानिक व्यापारी त्रस्त झाले आहेत. ...
गेली पाच वर्षे पुण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करता आल्या, आणखी काही करायच्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी मी पक्षाकडे पुन्हा उमेदवारी मागत आहे, असे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले. ...
डुडुळगाव (ता. हवेली) वन विभागात शुक्रवारी दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. वन विभागाच्या पथकाला चकवा देत बिबट्याने धूम ठोकली. असे असले, तरी शनिवारी सकाळी शेतामध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. ...
आजच्या धावपळीच्या युगात फिटनेस जपणे अनिवार्य होऊन बसले आहे. फिटनेससाठी धावणे हा आदर्श व्यायामप्रकार आहे. हे पाहता ‘लोकमत’ने आयोजित केलेली महामॅरेथॉन निश्चितच कौतुकास्पद आहे ...
अच्छे दिन येणार असे आश्वासन देत भाजपा सरकारने सत्तेत येऊन साडेचार वर्षे पूर्ण केली. निवडणुका तोंडावर आल्याने पुन्हा जनतेला भावनिक आवाहन केले जात आहे. ...