रायगड जिल्ह्यात वर्षाला पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेटी देतात. पर्यटकांच्या आगमनाने वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ...
जगभरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यात संगणकाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. याच संगणक प्रणालीचा वापर सरकारी कामकाजात आणल्यामुळे वेळेबरोबरच पैशांचा अपव्यय टळत आहे. ...
चालू गळीत हंगामात डिसेंबरअखेर राज्यात ३९८ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप झाले असून ४१ लाख १६ हजार ४८ टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपात पुणे विभाग तर उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे. ...
कर्नाटक राज्यातून सिंधुदुर्गच्या हद्दीमध्ये प्रवेश करून गेली पंधरा वर्षे येथील शेती, बागायतीच्या नासधुसीपासून मनुष्यहानीपर्यंत पोहोचलेल्या जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्याची पहिली पायरी यशस्वी ठरली आहे. ...
तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीने हाहाकार उडविला आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ थंडीने थरारला आहे. येथील द्राक्षमळ्यांमध्ये अक्षरश: शेकोट्या शेतक-यांनी पेटविल्या आहे. ...