मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की.... हा खणखणीत आवाज शिवाजी पार्कच्या आसमंतात घुमला आणि जमलेल्या लाखो लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि गगनभेदी घोषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी समारंभ डोळ्यात साठवला. ...
शिवाजी पार्कच्या भव्य मैदानावर शिवसेनेचा भगवा आणि तिरंगा ध्वजावर पंजा तसेच घड्याळ असलेला तिरंगा असलेले काँग्रेस, राष्ट्रवादीचे झेंडे यांनी गुरुवारी महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाची नांदी दिली. ...