शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

 सामूहिक कामगिरीच्या जोरावर जिल्हा परिषदेचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 11:56 AM

कोल्हापूर जिल्हा परिषद याला अपवाद नसली तरी राबविलेल्या अनेक योजना केवळ राज्याने नव्हे तर देशाने स्वीकारल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. २०१८/१९ या वर्षासाठी जिल्हा परिषदेने जी चौफेर कामगिरी केली, तिची दखल घेत ‘पंचायत राज’मध्ये राज्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावून २० लाखांचे बक्षीस जिल्हा परिषदेने मिळविले आहे.

ठळक मुद्दे बाराही तालुक्यांमध्ये याबाबतची शिबिरे घेण्यात आली. त्यामध्ये ४५ हजार एवढ्या दिव्यांगांची नोंदणी झाली.

समीर देशपांडेकोल्हापूर : गेल्या पंधरा-वीस दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या तीन महत्त्वाच्या व अभिमानास्पद घटना घडल्या. पंचायत राज अभियानामध्ये महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या जिल्हा परिषदेने देशभरामध्ये एकाच जिल्ह्यात सर्वाधिक दिव्यांगांना साहित्य वितरणाचा विक्रम घडविला; तर दुसरीकडे आतापर्यंत पहिल्यांदाच ताराराणी महोत्सवातून ५० लाख रुपयांहून अधिक वस्तूंची विक्री झाली.

पदाधिकारी, अधिकारी आणि अगदी ग्रामपंचायतीच्या पातळीवरील ग्रामसेवकांपर्यंत सामूहिक ताकद लावली तर काय होते, याची ही उदाहरणे आहेत. जिल्हा परिषद नेहमी बदल्या, घोटाळे, आरोप, प्रत्यारोप यांमुळे चर्चेत असते; परंतु कोल्हापूर जिल्हा परिषद याला अपवाद नसली तरी कोल्हापूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या अनेक योजना केवळ राज्याने नव्हे तर देशाने स्वीकारल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. २०१८/१९ या वर्षासाठी जिल्हा परिषदेने जी चौफेर कामगिरी केली, तिची दखल घेत ‘पंचायत राज’मध्ये राज्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावून २० लाखांचे बक्षीस जिल्हा परिषदेने मिळविले आहे.

यातील ‘दिव्यांग उन्नती अभियान’ सुरू करण्याची संपूर्ण कल्पना सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांची आहे. तत्कालीन पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी हे अभियान मनावर घेतले आणि जिल्ह्यातून दिव्यांगांच्या नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बाराही तालुक्यांमध्ये याबाबतची शिबिरे घेण्यात आली. त्यामध्ये ४५ हजार एवढ्या दिव्यांगांची नोंदणी झाली.

याआधी राजकोट येथे दिव्यांगांना सर्वाधिक वस्तूंचे वितरण करण्याचा कार्यक्रम झाला होता. मात्र तेथे एकाच जिल्ह्यातील दिव्यांग नव्हते. कोल्हापुरात एकाच जिल्ह्यातील १५ हजारांहून अधिक दिव्यांगांना साहित्य दिले गेल्याने हा देशातील सर्वाधिक वस्तू वितरणाचा कार्यक्रम ठरला आहे. आडसूळ यांच्या या संकल्पनेला संपूर्ण जिल्ह्याने प्रतिसाद दिला आणि गेल्या सहा महिन्यांत जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनीही यामध्ये मोलाची भूमिका बजावली.

आयर्विन ख्रिश्चन मैदानावर झालेल्या ‘ताराराणी महोत्सवा’मध्ये आतापर्यंतच सर्वाधिक म्हणजे ५० लाख ९४ हजार ७०० रुपयांच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांची विक्री करण्यात आली. बाराही जिल्ह्यांतून आलेल्या महिलांनी ही मोठी कर्तबगारी दाखविली आहे. मुंबई येथे झालेल्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनातही देशभरात सर्वाधिक विक्री झालेला तिसºया क्रमांकाचा स्टॉल हा कोल्हापूर जिल्ह्यातीलच ठरला आहे.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने आणि त्यांच्या सहकाºयांनी हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी खूपच परिश्रम घेतले आहेत, ते कारणी लागले आहेत. अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रकल्प संचालक रवी शिवदास यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, सदस्यांसह गटविकास अधिकारी आणि कर्मचाºयांचेच यामध्ये योगदान राहिले आहे.अधिकारी, पदाधिकाºयांचा समन्वयअधिकारी आणि पदाधिकाºयांच्या समन्वयाशिवाय असे मोठे उपक्रम घडू शकत नाहीत. अधिकाºयांच्या विधायक भूमिकेला पूर्ण पाठबळ देण्याची परंपरा कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आहे. तीच पाळली गेल्यामुळे ‘पंचायत राज’मध्ये यश मिळाले. ‘दिव्यांग उन्नती अभियान’ यशस्वी झाले; तसेच ताराराणी महोत्सवही यशस्वी झाला. याच पद्धतीने पदाधिकाºयांनी (कारभाºयांचा आततायीपणा टाळून) अधिकाºयांशी समन्वय ठेवला, तर आणखी अनेक चांगल्या घटनांचा साक्षीदार होण्याचे भाग्य जिल्हा परिषदेला मिळणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद