शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक हालचाली सुरू, जाणून घ्या जिल्हावार वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:08 IST

निवडणूक आयोगाने तपासणीसाठी दिलेले जिल्हावार वेळापत्रक

कोल्हापूर : राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांची प्रारूप प्रभाग रचना तपासणीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केले. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची प्रशासकीय सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे लवकरच हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव अ. गो. जाधव यांनी याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी पत्र पाठविले आहे. सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. १८, दि. ३१/०१/२०२२ मधील सुधारित तरतुदीनुसार या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची प्रारूप प्रभाग रचना सध्या जिल्हाधिकारी कार्यालय पातळीवर तयार करण्यात आली आहे.हे सर्व कामकाज हाताळणारे उपजिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणीकरिता येत्या मंगळवारपासून म्हणजे ८ फेब्रुवारीपासून राज्य निवडणूक कार्यालयात दिलेल्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता उपस्थिती लावायची आहे.

त्यानुसार प्रभाग रचनेची हार्ड, तसेच सॉफ्ट कॉपी, नकाशे सोबत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर जिल्हा परिषदेचे मतदारसंघ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ३५ हजार मतदारसंख्येचा एक मतदारसंघ तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात मतदारसंघ वाढणार आहेत.

निवडणूक आयोगाने तपासणीसाठी दिलेले जिल्हावार वेळापत्रक

दिनांक                        जिल्हे

८ फेब्रुवारी २२             रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

९ फेब्रुवारी २२            नाशिक, जळगाव, अहमदनगर

१० फेब्रुवारी २२           पुणे, सातारा

११ फेब्रुवारी २२          कोल्हापूर, सांगली, सोलापूर

१२ फेब्रुवारी २२         औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर

१३ फेब्रुवारी २२         अमरावती, बुलडाणा, यवतमाळ

१४ फेब्रुवारी २२         चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकzpजिल्हा परिषद