शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लग्नासाठी मुलगी बघायला गावी येणाऱ्या तरुणाला काळाने गाठले, अपघातात झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 15:48 IST

स्वत:च दिली अपघाताची माहिती

गडहिंग्लज : लग्नासाठी मुलगी बघायला दुचाकीवरून गावी येणाऱ्या तरुणाला काळाने वाटतेच गाठले. बंगळुरूहून गडहिंग्लजला येणाऱ्या आशिष वामन सुतार (वय ३३, रा.भगतसिंग रोड, गडहिंग्लज) याचा हुबळीनजीक झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (२८) सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.

अधिक माहिती अशी, आशिष याचे कुटुंबीय मूळचे आजरा तालुक्यातील कानोलीचे रहिवासी होत. गेल्या काही वर्षांपासून ते गडहिंग्लजमध्ये स्थायिक झाले आहेत. आशिष हा बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत डिझायनर म्हणून कार्यरत होता. कुटुंबीयांनी यंदा त्याच्या विवाहाचा बेत आखला होता. रविवारी एक स्थळ पाहण्याच्या निमित्ताने तो दुचाकीवरून गडहिंग्लजला येत होता. हुबळीनजीक सकाळी त्याच्या दुचाकीला अपघात झाला. त्याच्यापश्चात आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.दरम्यान, सोमवारी सायंकाळी हुबळीहून त्याचा मृतदेह गडहिंग्लज येथील राहत्या घरी आणण्यात आला. त्यानंतर, रात्री मूळगावी कानोली येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटुंबीयांना धक्का..!आशिषने ‘कमर्शियल आर्ट्स’ची पदव्युत्तर पदवी घेतली होती. बंगळुरू येथील एका खासगी कंपनीत तो सीनिअर डिझायनर स्पेशालिस्ट म्हणून नोकरीला होता. त्याला प्रवास, फोटोग्राफी व ट्रेकिंगचा छंद होता. कमावत्या मुलाच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

स्वत:च दिली अपघाताची माहितीराष्ट्रीय महामार्गावर हुबळीनजीक धावती दुचाकी स्लीप झाल्याने आशिष खाली पडला. त्यानंतर त्याने स्वत: फोन करून घरच्यांना आपला अपघात झाल्याची माहिती दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू