शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी सोनूकुमारचा पगार खिशातच राहिला, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 16:33 IST

कुटुंबाला आधार द्यायचा म्हणून दोन हजार किलोमीटर लांब रोजगार शोधत आला; परंतु तो पुन्हा मागे गेलाच नाही.

कोल्हापूर : महिन्याचा पगार झाला, आई-वडिलांना पैसे पाठवायची म्हणून त्याची केवढी धावपळ; परंतु नियतीच्या मनात वेगळेच काही होते. बँकेत पगार जमा करण्यास जातानाच त्याला भरधाव वाहनाने उडवले व गुरुवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. पगाराचे पाकीट त्याच्या खिशातच राहिले. गावाहून येण्यास तीन दिवस लागत असल्याने आई-वडिलाना अंत्यदर्शनही घेता आले नाही. त्याच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.टीचभर पोटासाठी दोन हजार किलोमीटर लांब आलेल्या बिहारमधील तरुणाची ही दुर्दैवी कथा आहे. सोनूकुमारचे गाव बिहारमधील सिस्टोला (जि. कटिहार) आहे. बांगलादेशाच्या सीमेजवळ हा जिल्हा येतो. प्रवास करायचा तर तीन दिवस लागतात. एवढ्या लांबून येऊन तो आठ-दहा हजारांवर बिगारीची कामे करीत होता. घरी आई-वडील, तीन भाऊ, तीन बहिणी. गरिबीमुळे तो वयाची १८ वर्षे पूर्ण होताच कागल पंचतारांकित कंपनीत कष्टाची कामे करण्यासाठी आला. गुरुवारी तो आणि त्याचा सहकारी पंकज कुमार हे पगाराचे पैसे घरी पाठविण्यासाठी दुचाकीवरून जवाहर साखर कारखान्याकडे जात होते. त्यावेळी समोरून आलेली मोटार आणि दुचाकी यामध्ये धडक झाली. यात सोनूकुमार आणि मागे बसलेला पंकजकुमार हे दोघेही गंभीर जखमी झाले. सोनुकूमारचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

मृत्यूचे वृत्त आई, वडिलांना मोबाइलवरून सांगण्यात आले. मात्र, तेथून येण्यास विलंब लागणार असल्याने येथेच त्याच्यावर अंत्यसंकार करण्यात आले. पगार झाला आहे, संध्याकाळपर्यंत पैसे मिळतील, असे कुटुंबीयांना सांगितलेल्या सोनूकुमारचा चटका लावणारा मृत्यू झाला. धडधाकट मुलगा कुटुंबाला आधार द्यायचा म्हणून रोजगार शोधत आला; परंतु तो पुन्हा मागे गेलाच नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू