लक्कीकट्टे धरणात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST2021-05-28T04:19:40+5:302021-05-28T04:19:40+5:30

सूरज चिंचणगी हा आज सकाळी आपल्या मित्रांसमवेत लकीकट्टे येथील धरणात पोहायला गेला होता. तासभर पोहल्यानंतर दमछाक होऊन पाण्यात बुडून ...

Youth drowns in Lakkikatte dam | लक्कीकट्टे धरणात बुडून युवकाचा मृत्यू

लक्कीकट्टे धरणात बुडून युवकाचा मृत्यू

सूरज चिंचणगी हा आज सकाळी आपल्या मित्रांसमवेत लकीकट्टे येथील धरणात पोहायला गेला होता. तासभर पोहल्यानंतर दमछाक होऊन पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दिवसभर त्याच्या मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू होते ..सूरज हा हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बीएस्सी भाग तीनच्या वर्गात शिकत होता. बीएसएस्सी झाल्यानंतर त्याची सैन्यात जायची इच्छा होती,पण नियतीने त्याची ही इच्छा पूर्ण केली नाही. प्रामाणिक आणि हुशार असलेल्या सूरजच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आईवडील, दोन भाऊ व एक बहीण आहे. अंधार झाल्याने शोधकार्य थांबले आहे.उद्या सकाळी पुन्हा मृतदेह शोधण्यात येणार आहे.

फोटो ओळी:-- २७ सूरज चिंचणगी

Web Title: Youth drowns in Lakkikatte dam