कोल्हापुरात फटाके वाजविण्यावरून तरुणांचा हल्ला; ४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:52 IST2018-05-28T00:52:18+5:302018-05-28T00:52:18+5:30

Youth attack on fireworks in Kolhapur; 4 injured | कोल्हापुरात फटाके वाजविण्यावरून तरुणांचा हल्ला; ४ जखमी

कोल्हापुरात फटाके वाजविण्यावरून तरुणांचा हल्ला; ४ जखमी


कोल्हापूर : घराच्या दारात फटाके का वाजविले, याबद्दल जाब विचारल्याच्या कारणावरून विचारेमाळ येथील पन्हाळकर गल्लीमध्ये राहणाऱ्या माळवी कुटुंबीयांवर तरुणांनी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात चारजण जखमी झाले. जखमींवर रविवारी उशिरा रात्री सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते.
रविवारी रात्री आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज व सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांत अंतिम सामना झाला. त्यात चेन्नई सुपर किंग्ज विजयी झाल्याच्या प्रीत्यर्थ विचारेमाळ पन्हाळकर गल्ली येथील माळवी यांच्या घरासमोर काही तरुणांनी फटाके उडविले. यावेळी फटाके उडविल्याच्या कारणावरून माळवी कुटुंब व तरुणांमध्ये वादावादी झाली. त्यातून तरुणांनी माळवी कुटुंबाच्या घरावर हल्ला केला. त्यात रंजना आनंदराव माळवी (वय ४९), विनायक आनंदराव माळवी (३४), जयदीप आनंदराव माळवी (२९), बाबासाहेब आनंदराव माळवी (३७) हे चौघे जखमी झाले. जखमींवर उशिरा रात्री सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत पोलीस चौकीत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Youth attack on fireworks in Kolhapur; 4 injured