चाकू हल्ल्यात तरुण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST2021-06-05T04:18:05+5:302021-06-05T04:18:05+5:30

कोल्हापूर : मित्राच्या घरी गेला होतास का? असे विचारलेल्या कारणावरून वाद निर्माण होऊन अमित रणजित शहा (रा. कोंडा ओळ ...

Young serious in knife attack | चाकू हल्ल्यात तरुण गंभीर

चाकू हल्ल्यात तरुण गंभीर

कोल्हापूर :

मित्राच्या घरी गेला होतास का? असे विचारलेल्या कारणावरून वाद निर्माण होऊन अमित रणजित शहा (रा. कोंडा ओळ ) याने रूपेश विलास सूर्यवंशी (वय ३५ रा. सोमवार पेठ) यास कांदा कापायच्या चाकूने कानाजवळ वार केला. आंबेवाडी येथील हॉलजवळ गुरुवारी दुपारी अडीच वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक पोतरे पुढील तपास करीत आहेत.

भाजी खरेदी करताना मोबाईल लंपास

कोल्हापूर :

ऋणमुक्तेश्वर भाजी मंडई येथे भाजी खरेदीसाठी आलेले विजयकुमार रामचंद्र कुंभार (वय ५४ रा. लक्षतीर्थ वसाहत) यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला. गुरुवारी (दी.३) सकाळी हा प्रकार घडला. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाली असून हेड कॉन्स्टेबल मून कुडची पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Young serious in knife attack