मोटारसायकल अपघातात तळेवाडीचा तरुण ठार

By Admin | Updated: May 8, 2014 18:44 IST2014-05-07T23:02:43+5:302014-05-08T18:44:27+5:30

नेसरी : नेसरी (ता. गडहिंग्लज)जवळील तळेवाडी येथील तरुणाचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. अतुल बाळासाहेब देसाई (वय २७) असे त्याचे नाव आहे. हा अपघात आज (बुधवार) सकाळी सव्वादहाच्या सुमारास तळेवाडी नवीन वसाहतीजवळील ओढ्याजवळ झाला.

A young man of Talewadi killed in a motorcycle accident | मोटारसायकल अपघातात तळेवाडीचा तरुण ठार

मोटारसायकल अपघातात तळेवाडीचा तरुण ठार

नेसरी : नेसरी (ता. गडहिंग्लज)जवळील तळेवाडी येथील तरुणाचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. अतुल बाळासाहेब देसाई (वय २७) असे त्याचे नाव आहे. हा अपघात आज (बुधवार) सकाळी सव्वादहाच्या सुमारास तळेवाडी नवीन वसाहतीजवळील ओढ्याजवळ झाला.
याबाबतची अधिक माहिती अशी, अतुल हा आपल्या घरी कार्यक्रम असल्याने पुण्याहून गावी आला होता. आज सकाळी तो बाजार करण्यासाठी नेसरी येथे मोटारसायकलवरून गेला होता. बाजार आटोपून तळेवाडीकडे येत असताना त्याचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने अपघात झाला.
त्याच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी आहेत. एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने नेसरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: A young man of Talewadi killed in a motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.