शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रागाने बघितल्याच्या कारणावरून ट्रॅक्टरखाली ढकलून तरुणाचा खून, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 22:44 IST

न्यायवैधक तपासणीसाठी तिरडी बांधून ठेवलेल्या मृतदेहाचा उलटा प्रवास

इचलकरंजी : रागाने बघितल्याच्या कारणावरून ट्रॅक्टरखाली ढकलून एका तरुणाचा खून करण्यात आला. विशाल आप्पासो लोकरे (वय 29 रा. संतमळा) असे त्याचे नांव आहे. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी न्यायवैधक तपासणी (फॉरेन्सीक लॅब) च्या तांत्रिक बाबीसाठी तिरडी बांधून ठेवलेला मृतदेह पुन्हा विच्छेदनासाठी उलटा प्रवास करत व्हाया आयजीएम, सांगली सिव्हील रुग्णालयात नेला. यामुळे नातेवाईकांना अंत्यविधीसाठी ताटकळत थांबावे लागले.

सागर मोहन वाघमारे (वय 29), यश अरुण चौगुले (वय 26), संतोष बळवंत मनोळे (वय 21, तिघे रा. संत मळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील संत मळ्यात राहणारा विशाल लोकरे आणि त्याचा मित्र अनिकेत सुनिल तोडकर (वय 20) हे दोघे शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास विकली मार्केट परिसरातील एका वाईन शॉपमध्ये गेले होते. तिथे आलेला सागर हा रागाने बघितल्याच्या कारणावरुन विशालसोबत वाद घालू लागला.

आकाश जगदाळेे, अरुण चव्हाण आणि महेश सुतार यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. तर सागर आणि त्याच्यासोबतचे यश व संतोष या तिघांनी विशालला धक्काबुक्की करत ठार मारण्याच्या उद्देशाने ऊस वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली ढकलून दिले. या घटनेत विशालच्या डोक्याला, पोटाला, मांडीला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सांगली सिव्हील रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला. विशाल याचा भाऊ निलेश लोकरे याच्या तक्रारीनुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान सांगलीतील रुग्णालयात विच्छेदन करुन नातेवाईकांनी मृतदेह शनिवारी सकाळी घरी आणला. परंतु न्यायवैधक तपासणी पथकाने घटनास्थळी केलेल्या पाहणीत काही तांत्रिक बाबी उपस्थित केल्या. त्यामुळे सर्व सोपस्कार करुन मृतदेह अंत्यविधीसाठी नेताना विशालच्या आणखी काही तांत्रिक नमुण्यासाठी पोलिसांनी शववाहिका अडवून तिरडीवर बांधलेला मृतदेह पुन्हा आयजीएम रुग्णालयात आणला. तेथे रुग्णालय प्रशासनाने ज्याठिकाणी शवविच्छेदन केले जाते त्याचठिकाणी ते नमुणे घेतले जातात, असे सांगितले. त्यामुळे मृतदेह पुन्हा सांगली सिव्हील रुग्णालयाकडे नेऊन नमुणे घेऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गावभाग पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेचे पथक कार्यरत झाले होते. त्यातील यश या संशयीतास गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतले. तर सागर आणि संतोष या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेशनच्या पथकाने सावंतवाडीतून ताब्यात घेतले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर