शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी धडकेत तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गोखले महाविद्यालय चौकानजीक भरधाव दुचाकीने पाठीमागून दिलेल्या धडकेत तरुण जखमी झाला. उपेंद्र उर्फ मायकेल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गोखले महाविद्यालय चौकानजीक भरधाव दुचाकीने पाठीमागून दिलेल्या धडकेत तरुण जखमी झाला. उपेंद्र उर्फ मायकेल प्रकाश आडगुणकर (वय ३०, रा. चिले कॉलनी, आयसोलेशन हॉस्पिटल रोड) असे जखमीचे नाव आहे. तो आपल्या दुचाकीवरुन अंबाबाई मंदिरातून घरी जात असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, अपघातानंतर धडक दिलेल्या दुचाकीस्वाराने पलायन केले. उपेंद्रच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची आई ज्योत्स्ना प्रकाश आडगुणकर यांनी जुना राजवाडा पोलिसात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात तक्रार दिली आहे.

मोबाईल चोरी

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडनजीक जिल्हा परिषद कॉलनीतील मैदानात फुटबॉल खेळाडूचा मोबाईल अज्ञाताने चोरला. गणेश कुंडलिक भोसले (वय १८, रा. अयोध्या कॉलनी, रिंगरोड) हा मैदानात फुटबॉल खेळत असताना, त्याने कडेला मोबाईल ठेवला होता, तो अज्ञाताने चोरला. गणेशने मोबाईल चोरीची तक्रार करवीर पोलिसात दिली.

दुचाकी चोरी

कोल्हापूर : कसबा बावडा येथे छत्रपती राजाराम कॉलनी, शुगर मील परिसरातून अज्ञाताने दुचाकी चोरुन नेली. प्रमोद केशवराव जाधव यांनी आपल्या घराच्या कंपाऊंडमध्ये उभी केलेली दुचाकी गुरुवारी मध्यरात्री अज्ञाताने चोरुन नेली. त्यांनी याबाबत शाहुपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.

‘सीबीएस’वरुन लॅपटॉप चोरी

कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून प्रवाशाचा सुमारे दहा हजार रुपयांचा लॅपटॉप अज्ञाताने चोरुन नेला. नितीन वसंत नलवडे (रा. नागाव, ता. हातकणंगले) यांनी याबाबत शाहुपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.