तरुणाची जबरदस्तीने सोन्याची चेन लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:41 IST2021-03-13T04:41:51+5:302021-03-13T04:41:51+5:30

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक ते परिख पुलाजवळ अज्ञात चौघाजणांनी दुचाकी आडवी घालत तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून ...

The young man forcibly lengthened the gold chain | तरुणाची जबरदस्तीने सोन्याची चेन लांबविली

तरुणाची जबरदस्तीने सोन्याची चेन लांबविली

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक ते परिख पुलाजवळ अज्ञात चौघाजणांनी दुचाकी आडवी घालत तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून लांबविली. याबाबतची फिर्याद शुभम जयसिंग सातपुते (वय २२, रा. पोलीस चौकी शेजारी, सुभाषनगर) यांनी दिली. त्यानुसार चार अज्ञातांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.१०) गुन्हा नोंद झाला. फिर्यादी शुभम हा मंगळवारी (दि.९) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास मणेरमळा, उचगाव (ता. करवीर) येथील फॅब्रिकेशनचे काम आटोपून मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आला. तेथून तो परिख पूल येथून सुभाषनगरकडे जात असताना अचानकपणे चौघेजण दुचाकी घेऊन आले. त्यापैकी एकाने गाडी आडवी घालून फिर्यादीची दुचाकी थांबविली. थांबल्यानंतर संशयिताने गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसडा मारून लांबविली. यात संशयित चोरट्याच्या हाती अर्धा तोळ्याची चेन हाती लागली. त्यानंतर तो अज्ञात संशयित दुचाकी तेथेच टाकून पळाला. याबाबत पोलीस हवालदार पांढरे तपास करीत आहेत.

Web Title: The young man forcibly lengthened the gold chain