आंबा येथे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST2020-12-05T05:00:14+5:302020-12-05T05:00:14+5:30
मिथुन रत्नागिरीहून कोल्हापूरकडे एकटेच निघाले होते. हृदयविकाराचा झटका येताच गाडी थांबविली पण, गाडीतून उतरता आले नाही. टेअरिंगवरच त्यांचा मृत्यू ...

आंबा येथे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मिथुन रत्नागिरीहून कोल्हापूरकडे एकटेच निघाले होते. हृदयविकाराचा झटका येताच गाडी थांबविली पण, गाडीतून उतरता आले नाही.
टेअरिंगवरच त्यांचा मृत्यू झाला. गाडी रस्त्यातच चालू राहिल्याने स्थानिकांनी पाहिले नि वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून काच फोडून त्यांची तपासणी केली. पण त्यापूर्वीच त्यांचा जीव गेला होता. येथील पोलीस पाटील यांनी फिर्याद देऊन शाहूवाडी पोलिसांनी याचा पंचनामा केला. व शवविच्छेदनास मलकापूर ग्रामीण रुग्णालयात मृतदेह दाखल केला आहे. खिशातील आधार कार्डवरून त्यांची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोबत फोटो देत आहे.