जोतिबा डोंगरावर इलेक्ट्रिक मोटरचा शॉक बसून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:26 IST2020-12-31T04:26:05+5:302020-12-31T04:26:05+5:30

कोल्हापूर : घराच्या बांधकामावर पाणी मारण्याचे काम सुरू असताना इलेक्ट्रिक मोटरचा शॉक लागून प्रद्युम्न मदन सातार्डेकर (वय १८, रा. ...

Young man dies after being hit by an electric motor on Jotiba hill | जोतिबा डोंगरावर इलेक्ट्रिक मोटरचा शॉक बसून युवकाचा मृत्यू

जोतिबा डोंगरावर इलेक्ट्रिक मोटरचा शॉक बसून युवकाचा मृत्यू

कोल्हापूर : घराच्या बांधकामावर पाणी मारण्याचे काम सुरू असताना इलेक्ट्रिक मोटरचा शॉक लागून प्रद्युम्न मदन सातार्डेकर (वय १८, रा. वाडी-रत्नागिरी) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी) येथे घडली. प्रद्युम्न सातार्डेकर हा बुधवारी दुपारी आपल्या नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारण्याचे काम करीत होता. विद्युत मोटर अचानक बंद पडल्याने तिची तपासणी करत असताना त्याला शॉक बसला. त्या धक्क्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने तेथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सीपीआर रुग़्णालयात दाखल केले. त्यावेळी उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. प्रद्युम्न हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो सध्या बारावीमध्ये शिकत होता. त्याच्या मृत्यूमुळे जोतिबा डोंगर (वाडी-रत्नागिरी) परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

फोटो नं. ३०१२२०२०-कोल-प्रद्युम्न सातार्डेकर

Web Title: Young man dies after being hit by an electric motor on Jotiba hill