शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

कावळेशेतच्या दरीत युवक कोसळला

By admin | Updated: August 25, 2014 00:02 IST

आंबोलीजवळील घटना : शोध सुरूच; सातारा जिल्ह्यातील युवक

आंबोली : आंबोली येथे पर्यटनासाठी आलेला रोहित किशोर भिसे (वय २५, रा. सातारा, पारगाव खंडाळा) हा युवक पाण्यातील पाईप व कठड्याचा अंदाज न आल्याने पाईपमधून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. गेळे-कावळेशेत येथील सुमारे सोळाशे फूट खोल दरीत तो कोसळला. ही घटना आज, रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. या ठिकाणी घडलेली महिन्याभरातील ही दुसरी घटना असून, त्या युवकाचा सायंकाळपर्यंत शोध सुरू होता. कोल्हापूर येथील नऊ युवक सुमो गाडीने आंबोली येथे वर्षापर्यटनासाठी आले होते. (पान ५ वर)आपत्कालीन विभागाचा वेळकाढूपणाआपत्कालीन व्यवस्थापनाच्या दिरंगाईचा व वेळकाढूपणाचा प्रत्यय पुन्हा आंबोलीत पहायला मिळाला आहे. घटना दुपारी १.३० वाजता घडूनही घटनास्थळी या व्यवस्थापनाच्या टीमला पोहोचण्यास सायंकाळचे सहा वाजले होते. त्यामुळे ही मोहीम दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आली. या मोहिमेतील सहभागी टीमचा यात कोणताही दोष नाही; परंतु वरिष्ठ स्तरावर निर्णय घेण्यास वेळ लागत असल्याने पुढील सर्वच घडामोडींना उशीर होत होता.दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हे युवक कावळेशेत येथे गेले होते. येथे असलेल्या पाईपच्या दोन फुटांवरून पाणी वाहत होते. त्यावेळी रोहित हा आपले चप्पल पाण्यात टाकून खेळत होता. अचानक तोल जाऊन तो पाईपच्या समोरील छोट्या डोहात पडला. याही परिस्थितीत त्याचा एक मित्र लवू जांभळे याने डोहात उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु तोही पाण्याच्या प्रवाहामुळे पाईपमधून नदीच्या दिशेने ओढला जाऊ लागला. प्रसंगावधान राखून इतर मित्रांनी त्याला वाचवले; परंतु रोहितला वाचविण्यात ते अपयशी ठरले. यात लवू जांभळे याच्या पायाला दुखापत झाली. याबाबतची माहिती गेळे पोलीस पाटील मोहन कदम यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्रात दिली. लागलीच पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एन. भिसे, ए. बी. नर आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली; परंतु रोहित कोठेही आढळून आला नाही. त्वरित आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधून रामेश्वर सावंत, कमलेश चव्हाण तसेच बाबल आल्मेडा यांच्या टीमला पाचारण केले. सायंकाळी उशिरापर्यंत या टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत होती. यावेळी घटनास्थळी तहसीलदार सतीष कदम व पोलीस निरीक्षक रणजित देसाई उपस्थित होते. (प्रतिनिधी) आजपासून शोधमोहीम हाती घेणारकावळेशेत दरीत कोसळेल्या युवकाला शोधण्यासाठी बाबल आल्मेडा यांचे पथक शिरशिगे येथून उद्या सकाळी शोधमोहीम राबवणार असून, आंबोलीतून रामेश्वर सावंत हे दरीत उतरणार असल्याची माहिती आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.रोहित हा कोल्हापूर येथील डी-मार्टमध्ये काम करीत होता. या प्रकारानंतर लगेच त्याच्या वडिलांना व नातेवाइकांना कळविण्यात आले. गेल्या महिन्यात याच ठिकाणी कर्नाटकातील पवन कुलकर्णी हा युवक वाहून गेला होता, त्याच ठिकाणावर आणि अगदी तशाच प्रकारे रोहित भिसे हा वाहून गेला. पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांनी या पाईपला जाळी बसविण्याची सूचना केली होती. तसे पत्रही बांधकाम विभागाला देण्यात आले होते, पण याबाबतची दखल घेतली नाही. त्यामुळेच आज आणखी एका युवकाचा प्राण गेला. याला जबाबदार कोण, असा सवाल गेळे ग्रामस्थ तसेच सरपंच प्रज्ञा परब यांनी केला आहे. बांधकाम अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.