अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याप्रकरणी तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:25 IST2021-04-01T04:25:26+5:302021-04-01T04:25:26+5:30

कोल्हापूर : येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित शुभम मोरे (रा. आयसोलेशन हॉस्पिटलनजीक, ...

Young man arrested for kidnapping a minor girl | अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याप्रकरणी तरुणास अटक

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याप्रकरणी तरुणास अटक

कोल्हापूर : येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित शुभम मोरे (रा. आयसोलेशन हॉस्पिटलनजीक, सम्राट कॉलनी) याला अटक केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काही दिवसांपासून शुभम हा उपनगरातील एका अल्पवयीन मुलीच्या मागावर होता. दि. २६ मार्च रोजी त्याने त्या मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी शुभम मोरे याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका केली. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही शुभमने तिला पळवून नेले होते. त्यामुळे त्याला पोक्सो कायद्यांतर्गत पोलिसानी अटक केली.

Web Title: Young man arrested for kidnapping a minor girl