बांधावरून पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST2021-06-05T04:18:02+5:302021-06-05T04:18:02+5:30

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राजाराम पाटील हे आपल्या नाळवा उगळी नावाच्या शेतामध्ये भात टोकण करण्यासाठी गेले ...

Young farmer dies after falling from dam | बांधावरून पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

बांधावरून पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राजाराम पाटील हे आपल्या नाळवा उगळी नावाच्या शेतामध्ये भात टोकण करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत मेहुणे सचिन यादव व अभिजित यादव होते. दुपारी तीनच्या सुमारास राजाराम पाटील हे टोकणीसाठी आणलेले भाताचे अर्धे पोते घेऊन दुसऱ्या वाफ्यामध्ये जात असताना बांधावरून तोल गेल्याने खाली पडले. शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. दरम्यान डोक्याला गंभीर आघात झाल्याने राजाराम पाटील यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, लहान मुलगा, मुलगी, विवाहित बहीण, आत्या असा मोठा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश पाटील करत आहेत. सात महिन्यांपूर्वी आईचे निधन झाले असून कुटुंबांची जबाबदारी पेलत असतानाच राजारामचे निधन झाल्याने पाटील कुटुंब पोरके झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Young farmer dies after falling from dam