योगेश साळे रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:16+5:302021-06-01T04:19:16+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे ...

Yogesh Sale admitted to hospital | योगेश साळे रुग्णालयात दाखल

योगेश साळे रुग्णालयात दाखल

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आला असून, ते बेशुद्धावस्थेत असल्याचे सांगण्यात आले.

डॉ. साळे हे दाढ दुखत असल्याने सकाळी दहानंतर कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात झाले होते. त्या ठिकाणी त्यांना तपासत असतानाच त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना उलटी झाली. यानंतर थोड्याच वेळात ते बेशुद्ध झाले. यावेळी त्यांच्यासमवेत माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई होते.

सीटी स्कॅन अहवाल नियमित आला असला तरी ऑक्सिजन पातळी कमी असल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. ते शुद्धीवर आल्यानंतर एमआरआय करण्यात येणार आहे. ही माहिती मिळताच जिल्हा परिषद, सीपीआर, वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर्सनी धाव घेतली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांच्याकडे त्यांचा कार्यभार देण्यात आला आहे.

Web Title: Yogesh Sale admitted to hospital