कळंबा कारागृहात मोबाइलप्रकरणी योगेश राणेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:33 IST2021-02-27T04:33:03+5:302021-02-27T04:33:03+5:30
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील एका झाडाच्या बुंध्याजवळ मोबाइल व तीन बॅटऱ्या असा मुद्देमाल बिस्किटाच्या पुड्यात सापडला होता. या ...

कळंबा कारागृहात मोबाइलप्रकरणी योगेश राणेला अटक
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील एका झाडाच्या बुंध्याजवळ मोबाइल व तीन बॅटऱ्या असा मुद्देमाल बिस्किटाच्या पुड्यात सापडला होता. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हा मोबाइल मोक्काअंतर्गत कारवाई झालेला संशयित योगेश राणे याचा असल्याचे तपासाअंति स्पष्ट झाले. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलिसांनी त्यास अटक केली.
कळंबा मध्यवर्ती कारागृहात ३१ डिसेंबर २०२० रोजी कारागृह प्रशासनाने कैद्यांसह बराकींची झाडाझडती घेतली होती. त्यात उंबराच्या झाडाच्या बुंध्याजवळ बिस्किटाच्या पुड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत एक मोबाइल व तीन बॅटऱ्या सापडल्या होत्या. कारागृह अधिकारी राकेश देवरे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात १ जानेवारी २०२१ ला याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानूसार पोलिसांनी ईएमआय क्रमांकाच्या आधारे तपास केला होता. त्यात हा मोबाइल मोक्का गुन्ह्/ातील संशयित योगेश राणे हा वापरत असल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानुसार शुक्रवारी त्यास पोलिसांनी अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.
फोटो : २६०२२०२१-कोल-योगेश राणे