यंदाचा फुटबाॅल हंगाम खेळाविना संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:32+5:302021-06-01T04:18:32+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाचा फुटबाॅल हंगाम सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे हंगाम संपल्याचे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन ...

This year's football season ended without a game | यंदाचा फुटबाॅल हंगाम खेळाविना संपला

यंदाचा फुटबाॅल हंगाम खेळाविना संपला

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाचा फुटबाॅल हंगाम सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे हंगाम संपल्याचे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (के.एस.ए) सोमवारी जाहीर केले. याबाबतचा निर्णय सोमवारी झालेल्या कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती संस्थेचे मानद सरचिटणीस माणिक मंडलिक यांनी सोमवारी दिली.

मागील वर्षी के.एस.ए.लीग, सतेज चषक फुटबाॅल स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट आली आणि संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे महापौर चषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दोन आणि अंतिम फेरीतील एक असे तीन सामने झाले नाहीत. त्यानंतर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी-जास्त होऊ लागला. त्यानंतर २०२०-२१ च्या नवा फुटबाॅल हंगामाची सुरुवात झाली. मात्र, त्यास जिल्हा प्रशासनाने सामने पाहण्यास फुटबाॅलप्रेमींची होणारी गर्दी लक्षात घेऊन परवानगी दिली नाही. त्यात पुन्हा दुसऱ्या लाटेचा कहर पुन्हा वाढू लागल्यामुळे सोमवारी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने यंदाचा हंगाम संपल्याचे जाहीर केले. गेल्या ७५ वर्षांच्या कोल्हापूरच्या फुटबाॅल इतिहासात लीग सामन्याविना प्रथमच हंगाम संपुष्टात आला आहे. मागील वर्षातील म्हणजेच २०१९-२० च्या के.एस.ए. बी डिव्हिजन पात्रता लीगचे सहा सामने व सी डिव्हिजनचे लीग सामने प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर घेतले जाणार आहेत.

प्रवेश शुल्क परत मिळणार

यंदाचा हंगाम होईल या आशेवर कोल्हापुरातील सोळा वरिष्ठ संघांनी के.एस.ए. लीगसाठी प्रवेशशुल्क के.एस.ए. कडे भरले होते. ते शुल्क संघांना परत दिले जाणार आहे.

संघांसह सामने असे

नोव्हेंबर ते ३१ मे या दरम्यान होणाऱ्या फुटबाॅल हंगामाकरिता वरिष्ठ गटातून १६ संघांसह ३२० खेळाडूंंची नोंदणी होते. त्यातून ५६ सामने खेळविले जातात. यासह सतेज चषक, महापौर चषक, चंद्रकांत चषक, नेताजी (अटलचषक), आदी स्पर्धा होतात; तर बी डिव्हिजनमधून १६ संघांसह ३२० खेळाडूंची नोंदणी होते. त्यातून ३६ लीगचे सामने होतात. या स्पर्धेतून पहिले दोन संघ वरिष्ठ गटात प्रवेश करतात. ‘क’ गटातून ६७ संघ सहभागी होतात. त्याचे सुमारे १०० सामने होतात. यात संघांकडून एकूण २००० हजार खेळाडू सहभागी होतात. यातील पहिले दोन संघ बी डिव्हिजनकरिता पात्र होतात. यातील वरिष्ठ लीग वगळता अन्य गटातील सामने झाले नाहीत.

Web Title: This year's football season ended without a game