शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

यासीन भटकळ विशाळगडावर आला होता, तर मग पोलिस गप्प का बसले?; हसन मुश्रीफ यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 15:51 IST

चौकशीनंतर सगळे समोर येईल, शाहूप्रेमींनी शांतता राखवी

कोल्हापूर : यासीन भटकळ हा विशाळगडावर राहिला होता, हे कालच समजले. तो आला असेल तर तो का आला? कोणाकडे राहिला आणि हे सगळे माहिती होते तर मग पाेलिस गप्प का बसले, याची चौकशी करू, अशी ग्वाही देत विशाळगड प्रकरणाची सगळी चौकशी होईल आणि सत्य समोर येईल. शाहूप्रेमींनी शांतता राखावी, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.मंत्री मुश्रीफ म्हणाले, त्या दिवशी संबंधितांनी कोणताही अनुसूचित प्रकार करणार नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना ग्वाही दिल्याने पोलिस गाफील राहिल्याचे दिसते. न्याय प्रविष्ट बाब नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया राबवली आहे. या प्रकरणाची मागे कोण आहे, हे सगळे चौकशीनंतर समोर येईल. नुकसानीचे पंचनामे केले असून त्या ४० कुटुंबांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल. आपण योग्य वेळी गजापूरला भेट देणार आहे. मात्र, कायदा सुव्यवस्था कशी राहील, वातावरण शांत कसे राहील, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. अशा प्रकारच्या दोन घटना या शाहू भूमीत घडल्या आहेत. यामुळे कोल्हापूर बदनाम होत आहे. यासाठी अशा घटना घडू नयेत, यासाठी शाहूप्रेमींनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफPoliceपोलिस