निधन वार्ता
१) यशवंतराव सावंत यांचे निधन
उत्तूर : आजरा येथील गृहरक्षक दलाचे राष्ट्रपतीपदक प्राप्त सेवानिवृत्त अधिकारी यशवंतराव गोविंदराव सावंत (वय ८३ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन, उद्या (सोमवारी) सकाळी आहे. ''मृत्यूंजय'' कार शिवाजीराव सावंत यांचे ते बंधू तर पत्रकार ज्योतीप्रसाद सावंत व जनता बँकेचे व्यवस्थापक माणिक सावंत यांचे ते वडील होत.
यशवंतराव सावंत : १००१२०२१-गड-०७
-----------------------
२) रवींद्र देशपांडे यांचे निधन
गडहिंग्लज : शहरातील रवींद्र केशव देशपांडे (वय ५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ व बहीण असा परिवार आहे. येथील शिवराज महाविद्यालयातून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. लायन्स क्लबचे प्रांतपाल व गजानन नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
* रवींद्र देशपांडे : १००१२०२१-गड-०५