शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोल्हापुरात एक्स बॅन्ड डॉप्लर रडार, पावसाचा अचूक अंदाज कळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:14 IST

पंतप्रधान मोदींनी नुकतीच केली घोषणा 

सतीश पाटील कोल्हापूर : पंचगंगा आणि कृष्णा खोऱ्यात महापूर रोखण्यासाठी आणि पावसाचा अचूक अंदाज कळण्यासाठी एक्स बॅंड डॉप्लर रडार कोल्हापूरला मिळणार आहे. अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन मौसम अंतर्गत १४ जानेवारी २०२४ रोजी केल्याची माहिती नाशिकचे शास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी लोकमतला दिली. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, भारतीय मौसम विज्ञान विभाग आय एम डी अंतर्गत आतापर्यंत पावसाची माहिती आणि अंदाज समजत आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात डॉप्लर रडार बसवलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा किती पाऊस पडणार आहे. याची अचूक माहिती मिळू शकते जर २०१९, आणि २०२१ सारखी अतिवृष्टी झाली तर ती आपल्याला आगोदर कळेल, पावसामुळे होणारे नुकसान, जिवीतहानी टाळता येईल. २०१० पूर्वीपासून महाराष्ट्रात एडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स डॉप्लर रडार नेटवर्क स्थापण्यासाठी नाशिकचे शास्त्रज्ञ प्रविण कुमार जोहरे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला यश आले असून महाराष्ट्रासाठी ५ नवीन एक्स-बॅंड (८-१२ गिगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी) डॉप्लर रडार बसवण्याची घोषणा पंतप्रधान मोदीनी केली. डॉप्लर रडार यंत्रणा मंजूरी बाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला असता. अद्याप केंद्र शासनाकडून कोणताही पत्रव्यवहार किंवा सुचना आलेली नाही असे सांगितले. 

कोल्हापूरसह नाशिक, पुणे, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर अशा ५ ठिकाणी डाॅपलर रडार यंत्रणा मंजूर करण्यात आली आहे. १४ जानेवारी २०२५ रोजी मिशन मौसम अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मंजूर केल आहे. गेल्या १४ वर्षांपासून आपण याचा पाठपुरावा करत होतो.  - प्रा. किरणकुमार जोहरे, आंतरराष्ट्रीय हवामान संशोधक व ढगफुटी तज्ज्ञ 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरweatherहवामान