शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लिपिकास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ‘आरटीओ’त लेखणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 15:58 IST

सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास बुधवारी (दि. २६) अटकावून ठेवलेले वाहन का सोडले, याचा जाब विचारीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे गुरुवारी दुपारी कर्मचारी संघटनेने ‘लेखणी बंद’ आंदोलन केले.

ठळक मुद्देलिपिकास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ‘आरटीओ’त लेखणी बंदसांगली उपप्रादेशिकमधील प्रकार; आंदोलनाचा फटका वाहनधारकांना

कोल्हापूर : सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास बुधवारी (दि. २६) अटकावून ठेवलेले वाहन का सोडले, याचा जाब विचारीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे गुरुवारी दुपारी कर्मचारी संघटनेने ‘लेखणी बंद’ आंदोलन केले.सांंगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील खटला विभागातील कनिष्ठ लिपिक दीपक देसाई यांनी रवींद्र चव्हाण (गजानन कॉलनी, कुपवाड रस्ता, सांगली) यांनी तक्रार दिलेला ट्रॅक्टर नियमानुसार कारवाई करीत सोडून दिला. त्यानंतर सदरचा ट्रॅक्टर का सोडला, याबद्दल चव्हाण याने व त्याच्या साथीदाराने देसाई यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली.

या घटनेनंतर सांगली येथील कर्मचाऱ्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात चव्हाण याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. या कृतीबद्दल चव्हाण याच्यावर कठोर कारवाई करावी. घटनेचा निषेध म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, कऱ्हाड या चार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी ‘लेखणी बंद’ आंदोलन केले.

या आंदोलनामुळे वाहन कर, वाहन नोंदणी, क्रमांक, आदींवर काही अंशी परिणाम झाला. या आंदोलनात आरटीओ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व्ही. व्ही. ठोंबरे, उपाध्यक्ष यू. एस. मुजावर, कार्याध्यक्ष आर. डी. गुजर, यू. आर. गिते, चिटणीस आय. एम. पुजारी, डी. एस. कापसे, अनिल सूर्यवंशी, एस. आर. मुगळीकर, आर. ए. मगदूम, एस. एस. वाळवेकर, आर. ए. नरसिंगे, एस. डी. कोरवी, डी. ए. पाटील, आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

 सांगली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिकास मारहाण झाल्याच्या निषेधर्थ गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे कर्मचाऱ्यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलन केले. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर