पैलवान शंकरराव पुजारींचे कुस्तीसाठी मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST2021-07-05T04:16:02+5:302021-07-05T04:16:02+5:30
जयसिंगपूर : ज्येष्ठ कुस्ती समालोचक पैलवान शंकरराव पुजारी यांचे ‘भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा’ हे पुस्तक म्हणजे नवोदित पैलवान ...

पैलवान शंकरराव पुजारींचे कुस्तीसाठी मोठे योगदान
जयसिंगपूर : ज्येष्ठ कुस्ती समालोचक पैलवान शंकरराव पुजारी यांचे ‘भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा’ हे पुस्तक म्हणजे नवोदित पैलवान आणि संपूर्ण कुस्ती क्षेत्रासाठी खुराक आहे. त्यांनी दिलेले कुस्तीसाठी योगदान फार मोठे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.
कोथळी (ता. शिरोळ) येथे माजी खासदार शेट्टी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पैलवान पुजारी यांनी भारतीय कुस्ती-इतिहास आणि परंपरा हे पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी पैलवान पुजारी यांच्या कार्याचा आढावा घेतला. पुस्तकरूपाने कुस्तीचा इतिहास जतन करून ठेवल्याबद्दल माजी खासदार शेट्टी यांच्याहस्ते पुजारी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी भीमगोंड बोरागावे, श्रीकांत पाटील, बाहुबली इसराणा, प्रकाश पुजारी, श्रीकांत सुतार उपस्थित होते.
फोटो - ०४०७२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - कोथळी (ता. शिरोळ) येथे पैलवान शंकरराव पुजारी यांचा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.