शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जातीच्या भिंती ओलांडून सासनकाठीची पूजा

By admin | Updated: April 3, 2015 00:47 IST

कोल्हापूरच्या शेख कुटुंबीय. कागल शिंदेवाडी गावातून येणाऱ्या सासनकाठीचा मुक्काम या मुस्लिम कुटुंबाकडे असतो. हे कुटुंब दोन दिवस या सासनकाठीच्या सेवेत तल्लीन असते.

जहाँगीर शेख - कागल-- राजर्षी शाहूंच्या करवीर नगरीत एकमेकांच्या धार्मिक सोहळ्यात जात-धर्म बाजूला टाकण्याची परंपरा नवी नाही. अशी अनेक कुटुंबे आहेत की, अशा धार्मिक परंपरेतील पुरोगामी विचारांची प्रतीकेच बनली आहेत. त्यापैकीच कोल्हापूरच्या पंचगंगा घाटाजवळ राहणारे शेख कुटुंबीय. कागल तालुक्यातील शिंदेवाडी या गावातून येणाऱ्या सासनकाठीचा मुक्काम दोन दिवस या मुस्लिम कुटुंबाकडे असतो. हे कुटुंब दोन दिवस या सासनकाठीच्या सेवेत तल्लीन झालेले असते. सासनकाठीचे मानकरी खराडे कुटुंबीय आणि शेख कुटुंबीयांनी गेली अनेक वर्षे ही परंपरा जपली आहे.दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेत शिंदेवाडीहून खराडे कुटुंबीयांची ही मानाची सासनकाठी येते. गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या आधी दोन दिवस ही पालखी पायी प्रस्थान करते. पहिला मुक्काम कात्यायनीच्या मंदिरात होतो, तर दुसऱ्या दिवशी पंचगंगा घाटाजवळील गायकवाड वाड्याजवळील महादेव मंदिरात या सासनकाठीचे आगमन होते. तेथे राहणारे शौकतअली शेख यांचे कुटुंबीय या सासनकाठीचे पूजन करतात. नैवेद्य तयार करतात. पालखीसोबत आलेल्या ३० ते ३५ लोकांसाठी जेवण, चहा, नाष्टा बनवितात. दुसऱ्या दिवशी ही सासनकाठी डोंगरावरील सोहळ्यात सहभागी होऊन परत मुक्कामासाठी येते. सासनकाठीच्या या सेवेसाठी शेख परिवारातील सर्व सदस्य दोन दिवस सणासारखे सहभागी होतात. पिढ्यान्-पिढ्या चालत आलेली परंपरा त्यांनी आजही जपली आहे. ही श्री जोतिबाची सासनकाठी बंधुभावाच्या शाश्वत श्रद्धेची सासनकाठी ठरली आहे. एक वेळ अशी आली की, आमच्या ईदच्या सणादिवशीच चैत्र यात्रा येऊन ही सासनकाठी आली. ती ईद आम्ही पूर्ण शाकाहारी बनविली आणि सासनकाठीसोबत आलेल्या भाविकांना ‘शिरखुर्मा’ही दिला. - शौकत शेख आमच्या वाडवडिलांपासून ही परंपरा चालू आहे. कोल्हापुरातील या दोन दिवसांच्या मुक्कामामध्ये शेख कुटुंबीय घरच्याप्रमाणे चहापाणी, नाष्टा, जेवण, साहित्याची जपणूक करतात. गोडधोड जेवण आणि नैवेद्यही तयार करतात. आमच्या खराडे कुटुंबीयांत आणि शेख कुटुंबीयांत जात-पात-धर्माचे अंतर उरलेले नाही. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन एक जिव्हाळा तयार झाला आहे. - दयानंद खराडे (शिंदेवाडी), मानकरी.६५ वर्षीय महंमदअली शेख सांगतात की, आमचे आजोबा अल्लीसाहेब हे राजर्षी शाहूंच्या दरबारात ‘वकील’ होते. त्यांच्याही पूर्वीपासून आमचे कुटुंब ही सेवा बजावत आहेत. आता शौकत आणि त्यांची पत्नी शफियाबी आणि त्यांची मुले तोहिद, नियाज हे ही परंपरा पुढे नेत आहेत. चैत्र यात्रा सुरू झाली की, आमचे सर्व लक्ष शिंदेवाडीच्या या सासनकाठीच्या आगमनाकडे लागलेले असते, तर शौकत शेख म्हणाले, आमचे हे नाते केवळ चैत्र यात्रेपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आम्ही नेहमीच एकमेकांच्या सुख-दु:खाच्या कार्यक्रमातही सहभागी होत आलो आहोत.शिंदेवाडीच्या सासनकाठीच्या सेवेची परंपरा सध्या जपत असलेले शौकत आणि शफियाबी शेख.