शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2024: पाचव्या माळेला अंबाबाई सरस्वती रूपात, उद्या जाणार त्र्यंबोली देवीच्या भेटीला

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 7, 2024 18:25 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात पाचव्या दिवशी सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची सरस्वती देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. उद्या मंगळवारी ललिता ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात पाचव्या दिवशी सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची सरस्वती देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. उद्या मंगळवारी ललिता पंचमीनिमित्त अंबाबाई त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाणार आहे. सकाळी साडेदहा वाजता देवीची उत्सवमूर्ती असलेली पालखी शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीसाठी प्रस्थान करील.नवरात्रोत्सवात रोज अंबाबाईची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते. सोमवारी अंबाबाईने सरस्वती देवीच्या रूपात अवतरीत होऊन भक्तांना आशीर्वाद दिले. श्री सरस्वती ही सत्त्वगुणप्रधान, ज्ञान, बुद्धी, वाचा, विद्या, कला संगीत, शिक्षणाची अधिष्ठात्री आहे. ऋग्वेदात सरस्वती देवीला अनेक स्तोत्रे समर्पित केली आहेत. जी कुंदपुष्प, चंद्र आणि मोत्यांच्या हाराप्रमाणे शुभ्र आहे. जिने शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. जिच्या हातात श्रेष्ठ अशी वीणा आहे. जी श्वेत कमलासनावर बसली आहे. जी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना सदैव वंदनीय आहे.

चतुर्भुजा सरस्वतीच्या हातामध्ये अक्षमाला, वीणा व पुस्तक शोभायमान आहे. तिचे वाहन हंस आहे. सरस्वतीला शारदांबा असेही म्हटले जाते. देवीची वैष्णोदेवी (काश्मीर), शृंगेरी (कर्नाटक), बासर (तेलंगणा ) येथे प्रसिद्ध मंदिरे आहेत. ही पूजा विद्याधर मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, अरुण मुनीश्वर यांनी बांधली.ललिता पंचमीनिमित्त अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. त्यामुळे उद्या मंगळवारी सकाळचा अभिषेक झाल्यानंतर देवीची पालखी शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीला प्रस्थान करील. दुपारी १२ वाजता शाहू छत्रपतींकडून कुमारिकेचे पूजन झाल्यानंतर कोहळा भेदनाचा विधी होईल. त्यानंतर सर्व पालख्या मार्गस्थ होतील. अंबाबाईची पालखी सायंकाळी ५ वाजता मंदिरात परत येईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर