शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Navratri2022: सहाव्या माळेला अंबाबाईची 'भुक्तिमुक्तिप्रदायिनी देवीच्या' रूपात सालंकृत पूजा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 1, 2022 17:23 IST

गेल्या पाच दिवसातील ४ लाखांवरील उच्चांकी गर्दी करत भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला आज, शनिवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची भुक्तिमुक्तिप्रदायिनी देवीच्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. गेल्या पाच दिवसातील ४ लाखांवरील उच्चांकी गर्दी करत भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. शनिवारच्या सुट्टीचा दिवस साधत राज्यच नव्हे तर देशभरातून आलेल्या भाविकांमुळे फक्त अंबाबाई मंदिर परिसरच नव्हे तर अवघ्या कोल्हापुरात जणू यात्रा भरली होती.भूतलवर असलेल्या करवीर म्हणजेच कोल्हापूर या अतिपावन तीर्थक्षेत्रात देव, मुनी, गंधर्व, सिद्ध, यक्ष, चारण, किन्नर यांचा वास आहे. हे जगतजननी अंबाबाईचे आद्यपीठ असून येथे भुक्ती आणि मुक्ती प्राप्त होते. सिद्धी, बुद्धी भोग आणि मोक्ष करणारी अंबाबाई येथे आहे. श्री दुर्गासप्तशतीच्या १२ अध्यायानुसार सुरथ राजा आणि समाधी वैश्य यांनी नदीच्या किनाऱ्यावर निराहारी राहून तीन वर्षे तपश्चर्या केल्यावर अंबाबाई त्यांच्यावर प्रसन्न झाली. तिने दोघांना वर मागण्यास सांगितले, त्यावर सुरथ राजाने आपले गेलेले राज्य व वैभव परत मिळावे असा वर मागितला. तर समाधीने आसक्तीचा नाश करणारे ज्ञान मागितले. देवीने दोघांनाही इच्छित वर दिले व गुप्त झाली. याप्रमाणे शनिवारची पूजा राजवैश्यवरप्रदान म्हणजेच भुक्तिमुक्तिप्रदायिनी देवी या रुपात होती. ही पूजा गजानन मुनीश्वर, मुकूल मुनीश्वर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दीगेल्या पाच दिवसांपैकी शुक्रवारी सव्वा तीन लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले होते. शनिवारी त्याहून अधिक गर्दी मंदिर परिसरात होती. पहाटे चार वाजल्यापासून मुख्य दर्शन रांगा भरल्या होत्या. शनिवार रविवार सलग सुट्ट्या असल्याने परगावची चार चाकी वाहने आणि बसेस कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यामुळे सगळीकडे वाहतुकीची कोंडी झाली. फक्त मंदिर परिसरच नव्हे तर अख्ख्या कोल्हापुरात जत्रा भरली की काय अशी स्थिती होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर