शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह ४७ संशोधकांना जागतिक मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:51+5:302021-06-09T04:30:51+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह ४७ संशोधकांना जागतिक मानांकन ...

World rankings for 47 researchers including Vice Chancellor, Q-Vice Chancellor of Shivaji University | शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह ४७ संशोधकांना जागतिक मानांकन

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह ४७ संशोधकांना जागतिक मानांकन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह ४७ संशोधकांना जागतिक मानांकन मिळाले आहे. ‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१’मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळण्याची ही पहिलीच घटना ठरल्याने ‘नॅक अ ’ पाठोपाठ विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे.

अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्रा. मूरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे ‘आल्पर-डॉजर सायंटिफिक इंडेक्स’ तथा ‘ए. डी. सायंटिफिक इंडेक्स’ विश्लेषित केलेला आहे. जगभरातील १८१ देशांतील १०,६५५ विद्यापीठांतील ५, ६५, ५५३ संशोधकांचा डाटा त्यांनी संकलित केला. कृषी व वने, कला व स्थापत्य, वाणिज्य व व्यवस्थापन, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, कायदे अभ्यास, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान, नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे यांसह अन्य २५६ उपशाखांमधील संशोधकांचा समावेशही या मानांकनामध्ये करण्यात आला आहे. त्यातून ‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२१’ जाहीर करण्यात आले आहे.

अत्यंत व्यापक स्तरावर घेण्यात आलेल्या या क्रमवारीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ४७ संशोधकांनी स्थान पटकावले आहे. या संशोधकांत स्थान मिळवणारे कुलगुरू डॉ. शिर्के हे संख्याशास्त्र विषयातील एकमेव संशोधक ठरले असून, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांना मटेरियल सायन्स व नॅनो विज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान मिळाले आहे. रसायनशास्त्राचे ११, पदार्थविज्ञान व मटेरियल सायन्सचे ९, वनस्पतिशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायनशास्त्र, नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचे प्रत्येकी ३, प्राणिशास्त्र, पर्यावरणशास्त्र, धातुविज्ञान, अन्नविज्ञान या विषयांचे प्रत्येकी २ आणि गणित, फार्मसी व संगणकशास्त्राचे प्रत्येकी १ असे एकूण ४७ आजी-माजी संशोधक समाविष्ट आहेत.

प्रतिक्रिया

शिवाजी विद्यापीठामध्ये विविध विषयांत सुरू असलेल्या अखंडित संशोधनाचे हे फलित आहे. यापूर्वीही स्टॅनफोर्ड विद्यापीठाने स्कोपस डाटाच्या आधारे जगातल्या आघाडीच्या २ टक्के संशोधकांची यादी जाहीर केली होती. त्यामध्येही आमच्या संशोधकांचा समावेश होता. त्या कार्याला ‘ए. डी. सायंटिफिक इंडेक्स’मुळे पुष्टी लाभली आहे. यात प्रत्येक संशोधक, शिक्षक, विद्यार्थी अभिनंदनास पात्र आहेत. हा वारसा आणि जागतिक संशोधन क्रमवारीतील हे स्थान वृद्धिंगत होण्याच्या दिशेने विद्यापीठातील समस्त संशोधक कार्यरत राहतील.

डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

ए. डी. सायंटिफिक इंडेक्स क्रमवारीत स्थान लाभलेले शिवाजी विद्यापीठातील संशोधक पुढीलप्रमाणे-

संख्याशास्त्र- डॉ. डी. टी. शिर्के

पदार्थविज्ञान, मटेरियल सायन्स व धातुविज्ञान-

डॉ. पी. एस. पाटील, डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. सी. एच. भोसले, डॉ. आण्णासाहेब मोहोळकर, डॉ. एन. आय. तरवाळ, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. टी. जे. शिंदे, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. ए. बी. गडकरी, डॉ. विजया पुरी, डॉ. सोनल चोंदे

रसायनशास्त्र-

डॉ. के. एम. गरडकर, डॉ. एस. एस. कोळेकर, डॉ. ए. व्ही. घुले, डॉ. एस. डी. डेळेकर, डॉ. जी. बी. कोळेकर, डॉ. डी. एम. पोरे, डॉ. राजश्री साळुंखे, डॉ. एम. बी. देशमुख, डॉ. डी. एच. दगडे, डॉ. गजानन राशीनकर, डॉ. अनंत दोड्डमणी

वनस्पतिशास्त्र-

डॉ. एन. बी. गायकवाड, डॉ. एन. एस. चव्हाण, डॉ. डी. के. गायकवाड

जैवतंत्रज्ञान व बायोरिमेडिएशन-

डॉ. एस. पी. गोविंदवार, डॉ. ज्योती जाधव, डॉ. नीरज राणे- जैवतंत्रज्ञान अधिविभागातील संशोधक विद्यार्थी

प्राणिशास्त्र- डॉ. एम. व्ही. शांताकुमार, डॉ. टी. व्ही. साठे

जैवरसायनशास्त्र-

डॉ. के. डी. सोनवणे, डॉ. पंकज पवार, डॉ. पी. बी. दंडगे

इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स -

डॉ. पी. एन. वासंबेकर, डॉ. टी. डी. डोंगळे, डॉ. आर. आर. मुधोळकर

नॅनोसायन्स व तंत्रज्ञान-

डॉ. एस. बी. सादळे, डॉ. एन. आर. प्रसाद, डॉ. किरण कुमार शर्मा

पर्यावरणशास्त्र-

डॉ. पी. डी. राऊत , डॉ. विजय कोरे

अन्नविज्ञान व अभियांत्रिकी-

डॉ. ए. के. साहू, डॉ. राहुल रणवीर

संगणकशास्त्र- डॉ. एस. आर. सावंत

गणितशास्त्र- डॉ. के. डी. कुचे

फार्मसी- डॅ. जॉन डिसुझा (तात्यासाहेब कोरे फार्मसी महाविद्यालय, वारणानगर)

फोटो : ०८०६२०२१-कोल-युनि शिर्के

फोटो : फोटो : ०८०६२०२१-कोल-युनि पाटील

Web Title: World rankings for 47 researchers including Vice Chancellor, Q-Vice Chancellor of Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.