Workers will be tested for antigen and vaccinated | कामगारांची ॲन्टिजन टेस्ट, लसीकरण करणार

कोल्हापुरात सोमवारी कामगारांच्या लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कामगारमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींची बैठक झाली.

ठळक मुद्देउद्योजकांनी शासनाला सहकार्य करावेमुश्रीफ, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची उद्योजकांसमवेत बैठक

 कोल्हापूर : संपूर्ण लॉकडाऊनबाबतच्या उद्योजकांच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील. उद्योग, व्यवसाय क्षेत्राने केलेल्या मागणीचा विचार केला जाईल. कोरोनाला रोखण्यासाठी उद्योजकांनी राज्य शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांची त्यांच्या कारखाने, औद्योगिक वसाहतींमध्ये जाऊन ॲन्टिजन टेस्ट, लसीकरण केले जाईल. त्यादृष्टीने उद्योजक आणि त्यांच्या संघटनांनी नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

कामगारांसाठीच्या आरटीपीआर चाचणीची अट रद्द करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली. त्याबाबत कामगारमंत्री मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बैठक झाली. जिल्ह्यात सुमारे तीन लाख कामगार आहेत. ती संख्या लक्षात आरटीपीसीआर चाचणी करणे खर्चिक, वेळखाऊ ठरणारे आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी रद्द करून लसीकरण करावे, अशी मागणी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन यांनी केली.

या बैठकीस इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष हर्षद दलाल, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, ह्यगोशिमाह्णचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, ह्यकोल्हापूर चेंबरह्णचे अध्यक्ष संजय शेटे, मॅकचे अध्यक्ष गोरख माळी, आयआयएफचे अध्यक्ष सुमित चौगुले, उद्योजक दीपक पाटील, अभय पंडितराव, संजय पेंडसे, राजू पाटील, प्रदीप व्हरांबळे उपस्थित होते.
 

Web Title: Workers will be tested for antigen and vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.