शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

कोल्हापूरात  बांधकाम कामगारांचा इशारा मोर्चा, शिमगा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 4:39 PM

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर इशारा मोर्चा काढला.

ठळक मुद्देकोल्हापूरात बांधकाम कामगारांचा इशारा मोर्चा, शिमगा आंदोलनाचा इशारा अन्यथा ऐन दिवाळीत पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर शिमगा करणार : कराड

कोल्हापूर : दिवाळीपूर्वी दहा हजार रूपयांचा बोनस द्यावा, मेडिक्लेम पूर्ववत सुरू करावे, आदी मागण्यांबाबत राज्य सरकारने दि. ४ नोव्हेंबरपर्यंत शासन आदेश काढावा, अन्यथा ऐन दिवाळीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्यावतीने शिमगा करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या कार्यालयासमोर असे आंदोलन केले जाईल, असा इशारा सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स्चे (सिटू) आॅल इंडिया उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी सोमवारी येथे दिला.

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर इशारा मोर्चा काढला.येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर इशारा मोर्चाच्या माध्यमातून आलेल्या आंदोलनकर्त्यांनी निषेध सभा घेतली.

राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर बांधकाम कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यातील दिवाळीपूर्वी दहा हजार रूपयांचा बोनस द्यावा. मेडिक्लेम योजना पूर्ववत सुरू करावी. ६० वर्षावरील बांधकाम कामगारांना पाच हजार रूपये पेन्शन द्यावी. लाभाची रक्कम दुप्पट करावी अशा काही मागण्या राज्य सरकारच्या पातळीवरील आहेत. त्याबाबतचा शासन आदेश सरकारने दि. ४ नोव्हेंबरपूर्वी काढावा, अन्यथा ऐन दिवाळीत पालकमंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून शिमगा केला जाईल, असा इशारा डॉ. कराड यांनी यावेळी दिला. त्याला उपस्थित कामगारांनी हात उंचावून घोषणा देत पाठिंबा दिला.

यानंतर लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भरमा कांबळे, सचिव शिवाजी मगदूम यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, सिटू आणि लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी एकच्या सुमारास दसरा चौकातून इशारा मोर्चा सुरू झाला.

हलगी-कैताळचा निनाद, ‘मेडिक्लेम बंद करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘कोण म्हणतयं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, अशा घोषणा देत रखरखत्या उन्हामध्ये मोर्चा पुढे सरकत राहिला. मोर्चातील महिला, पुरूष कामगारांच्या हातात मागण्यांचे फलक, संघटनेचे झेंडे होते. फोर्ड कॉर्नर, व्हिनस कॉर्नर मार्गे शाहुपुरीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे मोर्चा आला.

या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कामगारांनी ठिय्या मारला. सरकारच्या निषेधार्थ आणि मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे १५ हजार बांधकाम कामगार सहभागी झाले. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर