शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: स्वाभिमानी आक्रमक, दत्तवाडमध्ये ऊस वाहतूक रोखली; ट्रॅक्टरची केली मोडतोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 16:32 IST

गळीत हंगामास सुरुवात होताच ऊस तोडणी करुन वाहतूक करणाऱ्याविरोधात स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक

मिलिंद देशपांडे

दत्तवाड : यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसासाठी टनाला एकरकमी एफआरपी व जादा ३५० रुपये घेतल्याशिवाय कांड्याला कोयता लावू देणार नसल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत केली होती. दरम्यान, सद्या अनेक कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली आहे. यासाठी ऊसतोड केल्याने दत्तवाड येथील स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. गुरुदत्त शुगरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर हल्ला करून मोडतोड देखील केली. त्यामुळे ऊस आंदोलनाला आक्रमक वळण लागण्याची शक्यता आहे.दत्तवाड ता. शिरोळ येथे गुरुदत्त शुगरमार्फत सकाळी ऊसतोड करण्यात आली. यावेळी गावातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी ऊसतोड करू नये अशी विनंती केली होती. पण ती डावलून ऊसतोड केल्याने दत्तवाड येथील स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी दुपारी दोन वाजता शेतातून ऊस घेऊन गुरुदत्त शुगरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर हल्ला करून त्याची मोडतोड केली.बांबरवाडी वसाहत समोर ट्रॅक्टर आला असता स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ट्रॅक्टरचे हेडलाईट फोडून टाकले व स्वाभिमानीने जाहीर केलेला दर कारखान्यांनी जाहीर केल्याशिवाय ऊस वाहतूक न करण्याचा इशारा दिला. यावेळी विवेक चौगुले, प्रकाश मगदूम, सचिन हेमगिरे, श्रेणिक धुपदाळे, प्रमोद व्हसकल्ले, सूरज हेमगिरे, सुकुमार सिदणाळे, अजित चौगुले, रावसो धोतरे, शितल धुपदाळे, राजू व्हसकल्ले, बाबू मुल्ला, भुजबली हेमगिरे, पिंटू स्वामी यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखाने