शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पशुखाद्य कारखान्यात टाकी साफ करताना कामगाराचा गुदमरून मृत्यू, पाच जण गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 16:32 IST

गडमुडशिंगी येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यातील घटना

गांधीनगर : गडमुडशिंगी (ता.करवीर) येथील श्रीमहालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात चारा वीट प्रकल्पातील पाण्याची टाकी साफ करतेवेळी संजय श्यामराव कांबळे (वय ५८, रा.वसगडे ता.करवीर) या सफाई कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला, तर अन्य पाच जण विषारी वायुमुळे जखमी झाले. राजेश जयवंत भांदिगीरे (वय ३२ रा.पुंगाव ता राधानगरी), रवींद्र शिवाजी मेकिरे (वय ३८ रा.गडमुडशिंगी ता.करवीर), रघुनाथ भैरू बारड (वय ५५, रा.साने गुरुजी वसाहत), संभाजी कृष्णा दाभाडे (रा.कोल्हापूर), दीपक भुई (पूर्ण पत्ता माहीत नाही) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी घडली.अधिक माहिती अशी, गडमुडशिंगी येथील श्रीमहालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात चारा वीट प्रकल्पालगत पाण्याची टाकी आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. ती साफ करण्याचे कंत्राट कोल्हापुरातील खासगी कंपनीला दिले होते. रविवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास दीपक भुई आणि संभाजी दाभाडे हे टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरले. त्यांनी टाकी धुण्यासाठी पावडर आणि पाणी टाकल्यामुळे टाकीत गॅस तयार होऊन त्यांच्या नाकात तोंडात गेल्याने दोघे जण गुदमरले. त्यांना बाहेर काढण्यासाठी सुपरवायझर राजेश भांदिगीरे आणि संजय कांबळे हे टाकीत उतरले. त्यांनाही विषारी वायू सहन न झाल्याने अस्वस्थ वाटू लागले. हे टाकीवर असलेल्या रवींद्र मेकिरे आणि रघुनाथ बारड या माथाडी कामगारांनी पाहिले. त्यांनी टाकीतील लोकांना बाहेर काढले, पण त्यांनाही विषारी वायूने अस्वस्थ वाटू लागले. या सर्वांना उपचारासाठी तत्काळ रुग्णवाहिकेने सीपीआरला पाठविण्यात आले, पण संजय श्यामराव कांबळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अन्य पाच जणांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबतची नोंद रात्री उशिरा गांधीनगर पोलिस ठाण्यात नोंदविण्याचे काम सुरू होते.

मृत संजय कांबळे यांच्या नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली. या प्रकरणी संबंधित दोषीवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजीत कुमार क्षीरसागर, गांधीनगरचे सपोनि दीपक जाधव यांनी नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू